Human-sized bats (Photo Credits: Twitter)

कोरोना संकटकाळात आता नवनवीन प्रानी दिसणं ते समोर येणं हे लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. सध्या ऑनलाईन माध्यमातून साधारण माणसाच्या उंची इतका मोठा वटवाघुळ व्हायरल होत आहे. इतका महाकाय वटवाघूळ पाहून देखील अनेकांना धस्स झाले असेल. नेहमीच्या वटवाघुळापेक्षा त्याचा आकार मोठा असल्याने आता अनेकांना त्याच्याबद्दल भीती आणि उत्सुकता दोन्ही आहे. Giant Golden-Crowned Flying Fox असं त्याचं नाव असून या वटवाघुळाच्या विशिष्ट प्रकाराबद्दल तुमच्या मनात आलेल्या सार्‍या प्रश्नांना आम्ही उत्तरं देणार आहोत.

दरम्यान मागील महिन्यात Alex या व्यक्तीने (@AlexJoestar622)या त्याच्या ट्वीटर अकाऊंट वरून Giant Golden-Crowned Flying Fox चे फोटो शेअर केले आहेत. त्याने मानवाच्या आकाराचा असा त्याचा उल्लेख केल्याने अनेकांच्या मनात त्याच्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. मात्र फिलिपाईन्समध्ये आढळणारा हा प्राणी मानवी उंचीचा नसून केवळ त्याचे पंख मोठे असल्याने त्याचा आकार भव्य वाटतो. अनेकांनी याबद्दल ट्वीट करत त्यांचे फोटो देखील शेअर केलेले आहेत.

ट्वीट

फोटोमध्ये तुम्हांला वटवाघुळांचा आकार मोठा दिसत असला तरीही तो प्रत्यक्षात तितका नाही. दरम्यान तो फोटोग्राफीच्या forced perspective technique चा वापर करून तसा भासवला गेला आहे. हा प्रकार अनेक पर्यटक करतात. एखाद्या स्थळासोबत आकार लहान मोठा करून तो टिपला जातो.

दरम्यान Giant Golden-Crowned Flying Fox चा विचार करता तो वटवाघुळांच्या प्रजातींमध्ये मोठा आहे. त्यांचे पंख 5-6 फीट लांब आहेत. त्यांच्या फोर आर्मची व्याप्ती सर्वात लांब म्हणजे 21215 मीमी आहे. तर 1.5 kgs वजन आहे. वटवाघुळांमध्ये ते सर्वात वजनदार आहेत. त्यामुळे आता तुम्हांला इतकी तर खात्री पटली असेल की हे मानवाच्या उंचीच्या नाहीत. त्यामुळे त्यांना घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. हे पहिल्यांदाच समोर आलेले फोटो नाहीत. 2 वर्षांपूर्वीदेखील ते व्हायरल झाले होते.