Sisters-In-Law Viral Vide | | (Photo Credits: Twitter)

संपत्तीवरुन सुरु असलेली घरगुती भांडणं (Property Dispute) घराबाहेर पडली की ती किती विकोपाला जातील काहीच सांगता येत नाही. रक्ताची माणसंही कधीकधी मग पाषाणहृदयी होतात आणि सुरु होतो एक संघर्ष. कधीकधी हा संघर्ष रस्त्यावरही पोहोचतो आणि बघ्यांना गर्दी करायला एक कारणही मिळते. राजस्थान (Rajasthan) येथील एका ठिकाणीही असेच काहीसे घडले. संपत्तीवरुन संघर्ष सुरु असलेल्या दोन जावांमध्ये लागलं भांडण. हे भांडण इतके विकोपाला गेले की, भांडता भांडता दोघी चक्क गटारीत पडल्या. गटारीत पडल्या तरी त्यांचे भांडण सुरुच होते. चिखलमाखल्या अंगाने त्या एकमेकींवर प्रहार करत होत्या. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे.

एकमेकींच्या जाऊबाई असलेल्या या दोन महिला भांडता भांडता चक्क गटारीत पडल्या. त्यामुळे दोन महिलांची भांडणे पाहण्यास जमलेला बघ्यांचा जमाव आता अधिकच जवळ येऊन गर्दी करत होता. त्यातील काही जण ओरडत होते. काहींनी दोघींनाही गटारीबाहेर येऊन भांडण्याचा सल्ला दिला. काहींनी भांडू नका आगोदर गटारीबाहेर या असे सांगितले. काहींनी या दोघींच्या भांडणाचे चित्रिकरण सुरु केले. इतक्यात एक पुरुष गटारीत उतरला. बहुदा हा दोघीपैकी एकीचा नातेवाईक असावा. त्याने भांडणाऱ्या दोघींपैकी एकीला पकडले आणि मारहाण करायला सुरुवात केली. जमाव आता अधिकच गोंगाट करत होता. जमावातील एक व्यक्ती पुढे झाला आणि गटारीच्या काठावर जाऊन आपण पडणार नाही अशा स्थितीत तोल सावरुन गटारीत उतरलेल्या पुरुष व्यक्तीवर लाथेने प्रहार करु लागला. ही विचित्र घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.  (हेही वाचा, वरातीमध्ये राडा: लग्नानंतर सासरी चाललेल्या नवरीला प्रियकराने नेले पळवून; नवरामुलगा आणि कुटुंबियांना मारहाण)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही घटना राजस्थान राज्यातील ब्यावर येथील स्थि पेट्रोल पंपाजवळील आहे. संपत्तीच्या वादावरुन या दोन्ही महिला एकमेकींसोबत भांडू लागल्या. सुरुवातीला एकमेकांना पाहून त्यांनी शिवीगाळ सुरु केली. नंतर त्यांनी झटापट सुरु केली. भांडता भांडता अखेर दोघी पेट्रोल पंपानजीकच्या गटारीत पडल्या. दोघींनी गटारीत पडल्या तरीही भांडण सुरुच ठेवले होते हे विशेष.

ट्विट

दरम्यान मारहाणीची ही घटना पोलिसांपर्यंत पोहोचली आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना पोलीस ठाण्यात नेले. येथे दोन्ही बाजूंनी परस्परांविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे सत्यपडताळणी करत आहेत. प्रकरणाचा तपासही सुरु आहे.