जवळजवळ प्रत्येकाला सापाची भीती (Snake) वाटते, परंतु काही लोक असे आहेत जे या विषारी प्राण्याला अजिबात घाबरत नाहीत. असे निर्भय लोक नेहमीच सर्पासमवेत विविध युक्त्या दाखवून जगाला आश्चर्यचकित करत असतात. आता बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने (Vidyut Jammwal) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यांना सापांची भीती वाटते अशांसाठी हा व्हिडीओ नाही. कोणी साप आपल्या नाकामध्ये (Nose) घालू शकते यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. मात्र त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पहावा लागेल.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती जिवंत साप आपल्या नाकामध्ये घालून तो तोंडातून बाहेर काढत आहे. विद्युत जामवालने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ नक्की कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीये. लोक हा व्हिडीओ फक्त शेअरच करत नाहीत, त्यावर कमेंट्स आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
View this post on Instagram
(हेही वाचा: रुग्णाच्या तोंडातून निघाला सापाच्या आकाराचा दीड फुट लांबीचा जिवंत किडा; डॉक्टरची झाले चकित)
हा व्हिडिओ जितका विचित्र आहे तितकाच तो क्रौर्याने भरलेला आहे म्हणून आता लोक अभिनेत्याला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘या सापाला का त्रास दिला जात आहे?’ दुसरा युजर म्हणतो, ‘खरंच मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, मी तुम्हाला अनफॉलो करत आहे.' कोणी म्हटले आहे की, ‘स्वतःच्या करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांचा वापर करू नये.’ अजून एक म्हणतो, ‘हा व्हिडीओ म्हणजे एक प्रकारे प्राण्यांचे शोषण आहे व हे थांबवणे आवश्यक आहे.