मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सतना (Satna) जिल्ह्यात एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. येथे एका रूग्णाच्या मुखातून सर्पाच्या आकाराचा एक सजीव किडा बाहेर आला आहे. असे सांगितले जात आहे की, हा रुग्ण गेल्या दोन वर्षांपासून पोटदुखीच्या त्रासाने त्रस्त आहे. यानंतर तो एका डॉक्टरांना भेटला आणि त्याने औषध घेणे सुरू केले. या दरम्यान, त्याच्या तोंडातून एक सापाच्या आकाराचा दीड फूट लांबीचा किडा बाहेर आला, जो पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. सतना जिल्ह्यातील नागौद येथे ही घटना समोर आली आहे.
येथे एस.एन. सिंह पाल यांच्या खाजगी क्लिनिकमध्ये जिल्हा पन्ना येथे राहणारा शान मोहम्मद, उपचारासाठी आला होता. त्याने सांगितले की, त्याच्या पोटात दुखत आहे आणि त्याला जेवणही जात नाही. डॉक्टर एस.एन.सिंह पाल यांनी या युवकाला औषधांचे चार डोस दिले. औषध घेतल्यानंतर युवकाच्या तोंडातून सुमारे दीड फूट सापाचा आकाराचा एक जिवंत जीव बाहेर आला. डॉक्टरांनी या युवकाला पोटातील जंत मारण्याचे औषध दिले होते, ज्यामुळे युवकाला उलटी झाली व हा जीव बाहेर आला.
या तरूणाने तो जीव प्लास्टिकच्या पिशवीत घालून डॉक्टरांना दाखवला. हा किडा पाहून डॉक्टरही चकित झाले. जेव्हा त्यांनी युवकाची तपासणी केली तेव्हा निदर्शनास आले की हा वर्म नावाचा एक किडा आहे, ज्यामुळे बहुतेकदा व्यक्तीच्या पोटात समस्या उद्भवतात. (हेही वाचा: व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी बिबट्याने घेतली उंच झेप, त्यानंतर झाले असे काही; पहा Viral Video)
या अळीमुळे व्यक्तीला भूक लागत नाही किंवा तो काहीही करु शकत नाही. हा किडा त्या व्यक्तीच्या तोंडात लाळ बनवतो. या डॉक्टरांच्या आयुष्यातील ही पहिली घटना आहे. राज्यात अशा प्रकारचे एकही प्रकरण समोर आले नाही, जिथे एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून सर्पाच्या आकाराचा किडा निघाला असेल. ही धक्कादायक बाब असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.