बिबट्याचा (Leopard) पळण्याचा वेग आणि त्याने केलेली शिकार तुम्ही यापूर्वी अनेक व्हिडिओजमधून पाहिली असेल. तसंच बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना देशातील विविध ठिकाणांहून यापूर्वी समोर आल्या आहेत. रहिवासी भागात (Residential Areas) बिबट्या घुसल्याचे अनेक प्रसंग आहेत. लहान मुलं, माणसं,पाळीव प्राणी यांच्या बिबट्याने जीवघेणे हल्ले केल्याचे अनेक व्हिडिओज आपण सोशल मीडिया (Social Media) माध्यमातून पाहिले आहेत. त्यातच आता व्हिडिओ बिबट्याच्या हल्ल्याचा अजून एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात एका व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी बिबट्याने मारलेली उंच उडी थक्क करणारी आहे.
हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "तो जवळ होता." व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, एक व्यक्ती कॉरीडॉरमध्ये वेगाने पळत आहे. पळता पळता तो जमीनवर पडतो. बिबट्याच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी ही व्यक्ती इतक्या वेगाने पळत असल्याचे काही क्षणांतच लक्षात येते. मात्र बिबट्याने इतक्या लहानशा जागेत मारलेली मोठी उडी पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. (घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याची बिबट्याने 'अशी' केली शिकार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, Watch Video)
पहा व्हिडिओ:
That was close pic.twitter.com/sSQHpcEXlP
— Susanta Nanda IFS (@susantananda3) June 24, 2021
दरम्यान, या व्हिडिओ आतापर्यंत 26.6K व्ह्युज मिळाले आहेत. तर 210 लोकांनी रिट्वीट केला असून 1,916 लोकांनी लाईक केला आहे. तसंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्यक्तीसोबत पुढे काय झाले, हे जाणून घेण्यासाठी लोक आतुर आहेत.