घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याची बिबट्याने 'अशी' केली शिकार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video)
Leopard Hunts a pet dog (Photo Credits: ANI)

Viral Video: वाघ, बिबट्या रहिवासी परिसरात (Residential Area) घुसलेल्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. अशावेळी माणसं आणि पाळीव प्राणी यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. महाराष्ट्रातील (Maharashtra) नाशिक (Nashik) येथून अशीच एक घटना समोर येत आहे. बिबट्याने (Leopard) दबक्या पावलाने येऊन घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याची शिकार केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. (यवतमाळ येथे वाघिणीचा गायीवर हल्ला, वन विभागाने उपाययोजना करण्याची गावकऱ्यांकडून मागणी)

नाशिक मधील भुसे गावातील ही घटना असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, एका घराबाहेर पाळीव कुत्रा झोपला आहे. त्यावेळेस बिबट्या दबक्या पावलाने येत कुत्र्याला तोंडात पकडून घेऊन जातो. (Tiger Fight Video: वाघाला भिडला वाघ, झुंज दोन वाघांची; डरकाळी सोबत नैसर्गिक संघर्षाची जबरदस्त झलक, पाहा व्हिडिओ)

पहा व्हिडिओ:

यापूर्वी देखील रहिवासी परिसरात घुसून वाघांनी हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील बडगाम येथे एका 4 वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना बिबट्या तिला उचलून घेऊन गेला. या हल्ल्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला आहे.