Kal Ho Naa Ho चित्रपटाचं अनोखं Version पाहिलं का? (Video)
शाहरुख खान, अभिनेता (Photo credits: IamSRK/facebook)

बॉलिवूडचा किंग खान हा गेल्या काही दशकांपासून बॉलिवूड चाहत्यांवर सातत्याने आपली छाप पाडत आहे. फक्त भारतातच नाही तर विदेशात ही शाहरुख खान(Shah Rukh Khan)चे चाहते खूप आहेत.शाहरुखने बॉलिवूडमधील आपले नाव सातासमुद्रापलीकडे पोहचविले आहे.

शाहरुख हा चित्रपटातून नेहमीच प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून त्यांच्यावर भुरळ पाडतो. तर चित्रपटातील गाणीसुद्धा एवढी सुपरहिट होतात की, ती  फक्त  भारतापूर्ती सिमित न राहता विदेशापर्यंत जाऊन पोहचतात. असाच एक शाहरुख खानच्या 'कल हो ना हो'(Kal Ho Naa Ho) या चित्रपटातील Tittle Songचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र व्हिडिओतील कलाकार हे भारतीय नसून चक्क नायझेरियन (Nigerian) मध्ये राहणारे आहेत.

बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असा शाहरुखचा 'झीरो'(Zero) चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.