Katrina Kaif in Zero, Rajneeti, Tiger Zinda Hai (Photo Credits: Movie stills)

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत मागील कित्येक वर्षांपासून कायम असलेलं नाव म्हणजे  कैटरीना  कैफ (Katrina Kaif). आज तिचा वाढदिवस आहे.  कैटरिनाने 2003 मध्ये ‘बूम’  (Boom) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती,  त्यानंतर मागे वळून न पाहता, मागील 16 वर्षांपासून तिने अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, एक था टायगर, टायगर जिंदा है यापासून ते अगदी अलीकडच्या भारत अशा चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. याबरोबरच चिकनी चमेली' (अग्निपथ), 'शीला की जवानी' (तीस मार खान) आणि 'कमली' (धूम 3) आयटम सॉंग्स मधून सुद्धा तिच्या हॉट ग्लॅमरस अदांनी प्रेक्षकांना भुरळ घातली.

बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्याआधी कैटरिनाने अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्सही केले. तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली. बॉलिवूड मध्ये आल्यावर सुरवातीला 'मैने प्यार क्यूँ किया' आणि 'हमको दिवाना कर गये' सारख्या सिनेमांमुळे कतरिनाला ग्लॅम डॉलची ओळख मिळाली होती. मात्र 2007 मध्ये आलेल्या 'नमस्ते लंडन' चित्रपटातल्या भूमिकेने तिने आपली ही ओळख पार पालटून टाकली. या पाठोपाठ राजनीती सिनेमातील तिच्या अभिनयाला टीकाकारांनी अगदी डोक्यावर घेतले होते, चला तर मग आज कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बॉलिवूड प्रवासातील महत्वाचे टप्पे जाणून घेऊयात

बूम

लंडनमधल्या एका मॉडेलिंग शो दरम्यान बूम सिनेमाचे दिग्दर्शक कैझाद गुस्ताद यांनी कैटरिनाला पाहिले होते. याच सिनेमातून कतरिनाने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात होणार असल्याने तिला कुठल्याच प्रकारची चूक करायची नव्हती. चित्रपटात तिला बॅडमॅन गुलशन ग्रोवर यांच्यासोबत काही हॉट सीन्स द्यायचे होते. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही चालला नाही पण यातील कैटरिनाचा हॉट अंदाज मात्र चांगलाच गाजला होता.

Katrina Kaif Boom Movie (Photo Credits: IMDB)

नमस्ते लंडन

या सिनेमात कैटरिनाने जस्मीत उर्फ जॅझ ही भूमिका साकारली होती. सिनेमात तिच्या अभिनयापेक्षा तिच्या लूकचीच चर्चा अधिक झाली होती. या मध्ये हलक्या ब्राउन रंगाच्या कुरळ्या केसातील कैटरिना त्यावेळी लाखो तरुणांची ड्रीम गर्ल झाली होती.

Katrina Kaif in Namastey London

राजनीती

आता पर्यंत बॉलिवूडची इंडस्ट्री ज्या बाहुली सारख्या दिसणाऱ्या कैटरिनाला ओळखत होती ती ओळख पुसून तिने राजनीती सिनेमातून एका नेत्याची दमदार भूमिका वठवली होती. या सिनेमात तिने खादी साडी आणि एखाद्या राजकारण्याला शोभेल अश्या रूपात साकारलेली इंदू आजही सर्वांच्या लक्षात आहे.

Katrina Kaif in Raajneeti

जिंदगी ना मिलेगी दोबारा

हा सिनेमा कैटरिनाच्या करिअरमधील सर्वात हिट भाग आहे. यात तिने लैला बनून आपल्या बिनधास्त पण तात्विक बोलण्याने वेगळीच छाप पाडली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती.

Hrithik Roshan and Katrina Kaif in Zindagi Na Milegi Dobara

टायगर सीरिज

आतापर्यंत कैटरिनाने बॉलिवूडच्या अनेक बड्या हिरों सोबत काम केले आहे, मात्र सलमान खान सोबतची तिची जोडी कमाल हिट आहे. याच हिट जोडीने एक था टायगर ,टायगर जिंदा है या दोन्ही भागातून पडद्यावर आपली जादू पसरवली होती. यात तिने पाकिस्तानी ISI एजंट झोया हुमैनी साकारली होती.

Katrina Kaif in Tiger Zinda Hai

झिरो

हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कामे करू शकला नसला तरी किंग खान शाहरुख सोबत कैटरिनाची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. यात तिने बबिता कुमारी या नावाने एक व्यसनी अभिनेत्री पडद्यावर दाखवली होती. तिचा हा रोल सिनेमात छोटा पण महत्वाचा होता.

Katrina Kaif in Zero

भारत

या सिनेमात सलमान सोबत पुन्हा एकदा कैटरिना कुमुद रैना बनून दिसली होती. या सिनेमाचे कथानक सहा दशकांच्या कालावधीतले असल्याने यात कैटरिनाचीही सहा रूपं पाहायला मिळाली होती. या सिनेमातला तिचा साडीतला लूक आणि कुमुद रैना बनून केलेला अभिनय हा खास उल्लेखनीय ठरला.

Katrina Kaif in Bharat.

कतरिनाचे सौंदर्य, अभिनय, आणि हटकेपणामुळे बॉलिवूड प्रेमींसाठी तिला रुपेरी पडद्यावर पाहणे नेहमीच एक पर्वणी असते, अशा या अभिनेत्रीला लेटेस्टली परिवाराकडून कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.