Sex with Many Women: 'माझा नवरा अनेक स्त्रियांसोबत 'सेक्स' करतो, मला त्या महिलांचा हेवा वाटत नाहीत'; Porn Star च्या पत्नीने व्यक्त केले मनोगत (Watch Video)
Robbie Oz (संग्रहित संपादित प्रतिमा)

संसार करताना अशी अनेक कारणे असतात, ज्यामुळे जोडप्यांमध्ये मतभेद होतात, भांडणे होतात. काही जोडपी एकमेकांना समजून घेऊन संसार करतात तर काहीजण घटस्फोट घेऊन मोकळे होतात. परंतु हाच संसार एखाद्या पॉर्नस्टारचा (Porn Star) असेल तर? साहजिकच अशा संसारामध्ये तर इतर जोडप्यांपेक्षा जास्त समस्या असतील अशा विचार तुम्ही कराल. परंतु पॉर्नस्टार रॉबी ओझ (Robbie Oz) आणि कॅटी बॅम्प्टन (Katy Bampton) यांचा संसार नक्कीच असा नाही. नुकतेच कॅटी बॅम्प्टनने लोकप्रिय पॉर्न स्टारसोबतच्या तिच्या लग्नाबद्दल उघडपणे भाष्य केले आहे.

आपला नवरा दर आठवड्याला इतर स्त्रियांसोबत लैंगिक संबंध (Sex) ठेवतो याबाबत आपल्याला त्रास होत नसल्याचे कॅटीने सांगितले आहे. ऑस्ट्रेलियन असलेल्या 29 वर्षीय कॅटी बॅम्प्टनने साखरपुड्यानंतर तीन महिन्यांनी पॉर्नस्टार रॉबी ओझशी लग्न केले. नुकतेच ‘हॅशटॅग अवर स्टोरीज’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या जोडप्याची स्टोरी पब्लिश झाली. या व्हिडीओमध्ये दोघांनीही आपल्या संसाराबद्दल आपली मते मांडली आहेत.

कॅटी म्हणते, ‘मी हे कधीच विसरणार नाही की आता हेच आमचे जीवन आहे आणि आम्हाला दररोज असेच जगावे लागणार आहे. मी एका पॉर्न स्टारशी लग्न केले आहे, त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी मला स्वीकाराव्या लागतील.’ ती पुढे सांगते, ‘किंकी जोडप्यासाठी त्यांचा प्रवास सहज होत नाही. सुरुवातीला मी ओझच्या या अशा कारकीर्दीबद्दल त्याला जज केले. मी पहिल्यांदा रॉबला इंस्टाग्रामवर पाहिले. तो एक सेक्स वर्कर आहे याबाबत मी त्याला जज केले. मला वाटले की अशा पुरुषात मला नक्कीच स्वारस्य नाही. तो अनेक मुलींसोबत सेक्स करतो त्यामुळे मला नक्कीच त्याच्यासोबत संबंध ठेवायचे नाहीत.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Robbie Oz (@robbieoztv)

बॅम्प्टनने पुढे सांगितले, ‘परंतु जेव्हा मी त्याला प्रत्यक्षात भेटले तेव्हा त्याच्याबद्दलचे माझे विचार पूर्णतः बदलले. रॉबला भेटून आणि त्याला जाणून घेतल्यानंतर त्याच्याबद्दलची माझी धारणा बदलली. ओझ दर आठवड्याला कामासाठी किमान दोन सीन शूट करतो. या दरम्यान तो अनेक स्त्रियांच्यासोबत सेक्स करतो, परंतु मला याचा मत्सर वाटत नाही.’ (हेही वाचा: Health Benefits of Kissing: निरोगी शरीरासह आरोग्यासाठी फायदेशीर आहे 'चुंबन'; जाणून घ्या फायदे)

 

View this post on Instagram

 

A post shared by Katy Bampton (@itskatyfit)

 

View this post on Instagram

 

A post shared by Katy Bampton (@itskatyfit)

ओझने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, ‘कामासाठी करत असलेला सेक्स आणि घरात पत्नीसोबत होत असलेला सेक्स यात बराच फरक आहे. पत्नीशी सेक्स हा भावनिक असतो.’ महत्वाचे म्हणजे बॅम्प्टनने हे देखील स्पष्ट केले की, ओझ ज्या महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवतो अशा महिलांबाबत ती खूपच ‘निवडक’ आहे.