Happy Eid ul-Fitr: वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी यांनी खास सॅन्ड आर्टच्या माध्यमातून दिल्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा!
Eid Mubarak sand art (Photo Credits: Twitter)

ईद मुबारक! मुस्लिम बांधव आज (25 मे) भारतामध्ये ईद साजरी करत आहे. दरम्यान या सणाचं औचित्य साधत अनेकांनी सोशल मीडियामध्ये मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज ईदच्या सणानिमित्त प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक  (Sudarsan Pattnaik) यांनी खास अंदाजात रमजान ईदचा आनंद द्विगुणित केला आहे. भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या सणांदिवशी  सुदर्शन पटनायक  वाळू शिल्प साकारत असतात. आज Eid ul-Fitr 2020 चं सेलिब्रेशन असताना त्यांनी सुंदर सॅन्ड आर्ट साकारत आजच्या रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Eid Mubarak 2020 Wishes: रमजान ईद च्या शुभेच्छा मराठी Messages, GIF Images, WhatsApp Stickers, Facebook Greetings च्या माध्यमातून शेअर करून 'ईद उल फितर' चा सण करा स्पेशल!

रमजान महिन्याची सांगता ईद ने होते. या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांना गळाभेट देत ईद मुबारकच्या शुभेच्छा देतात. महिनाभर रोजा म्हणजेच कडक व्रतांचा उपवास केल्यानंतर Eid ul-Fitr हा सणाने त्याची सांगता होते. ईद निमित्त बिर्याणी, शीर कुर्मा यांची दावत असते. सण-वार, थोरा-मोठ्यांचे वाढदिवस, महत्त्वाच्या घटना पाहून त्याचं सॅन्ड आर्ट साकरण्यात सुदर्शन पटनाईक यांचा हातखंडा आहे. ते पुरी मधील ओडिशा बीचवर ही सॅन्ड आर्ट साकारतात.

सुदर्शन पटनाईक यांचं वाळू शिल्प

आज  सुदर्शन पटनायक यांनी साकरलेल्या वाळू शिल्पामध्ये ईदचा चंद्र रेखाटत मागे मशीद काढून ईद मुबारक असं लिहलं आहे. Happy Eid-Al-Fitr असं लिहून त्यांनी भारतीयांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.