Mumbai Shocker: धक्कादायक! जोगेश्वरी परिसरात मांसाच्या व्यापारासाठी गोण्यांमध्ये बांधून नेणाऱ्या भटक्या कुत्र्यांची सुटका; Watch Video
Stray Dogs (PC - Instagram)

Mumbai Shocker: मुंबईतील जोगेश्वरी (Jogeshwari) परिसरात मांसाच्या व्यापारासाठी गोण्यात बांधून नेण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांची (Stray Dogs) सुटका करण्यात आली. ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला या कुत्र्यांची सुटका करताना दिसत आहेत. कुत्र्यांचे तोंड व पाय धारदार तारांनी बांधलेले होते. ही घटना जोगेश्वरी पश्चिम येथील मोमीन नगर समोर घडली आहे.

दोन कुत्रे तारांनी पूर्णपणे बांधलेले आहेत. त्यांचे तोंड आणि चारही हातपाय अत्यंत निर्दयीपणे बांधले गेले होते. या घटनेचा व्हिडिओ स्ट्रीट डॉग्स ऑफ बॉम्बेच्या इंस्टाग्रामवरील अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ऑटोमध्‍ये प्रवास करणार्‍या महिलेला दोन जण कुत्र्यांना गोणीमध्ये घेऊन जाताना दिसले. त्या महिलेला गोण्यांच्या गोण्यांमधून आवाजही ऐकू आला. आवाज ऐकून ती ऑटोमधून खाली उतरली आणि पुरुषांना सॅक उघडण्याची मागणी केली. पुरुषांनी गोणी उघडल्या तेव्हा त्यांत महिलेला कुत्रे दिसले. तिने कुत्र्यांना सोडून देण्याची मागणी केली. (हेही वाचा - Women Nagin Dance Video: OMG! कोर्टरूममध्ये महिलेने केला नागिन डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात, Watch)

पुरुषांनी कुत्र्यांच्या तोंडाला आणि पायाभोवती बांधलेल्या तारा कापून उघडल्या. ट्विटमध्ये मुंबई पोलिसांना टॅग करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.