Women Nagin Dance Video: कोर्टरूममध्ये जोरदार वादविवाद आणि युक्तिवादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, यूपीमधील सहारनपूरच्या फॅमिली कोर्ट रूममधून असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. कोर्टरूममध्ये, एक महिला अचानक जमिनीवर लोळत नागिन नृत्य करू लागते. तिला असा सर्प डान्स करताना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. तेथे उपस्थित असलेले वकील आणि पोलीस कर्मचारी हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र, काही वेळाने महिलेने स्वतःच आपला डान्स थांबवला. हा व्हिडिओ एका सोशल मीडिया यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे.

जमिनीवर पडून महिलेने नागिन डान्स करण्यास सुरुवात केली. यावेळी ती तिच्या तोंडातून सापासारखे आवाज काढताना दिसली. या महिलेला पाहून तेथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)