Black Panther Viral Video: देशाच्या पर्वतीय जंगलात आढळला दुर्मिळ ब्लॅक पँथर; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ब्लॅक पँथर (Photo Credits: Twitter)

Black Panther Viral Video: सध्या सोशल मीडियावर दुर्मिळ ब्लॅक पँथर (Rare Black Panther) चा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ब्लॅक पँथर भारतातील पर्वतीय जंगलात (Mountain Forest) फिरताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी (Indian Forest Service) प्रवीण कास्वान (Parveen Kaswan) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला कास्वान यांनी 'भारत का ब्लॅक पँथर (The Black Panther of India)…हे ठिकाण उघड होणार नाही. हा व्हिडिओ कर्मचार्‍यांनी पाठवला आहे,' असं कॅप्शन दिलं आहे. ब्लॅक पँथर (Black Panther) चा हा व्हिडिओ 24 ऑक्टोबर रोजी शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ 1 मिनिट 28 सेकंदाचा आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 164.3k पेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून 13.8k जणांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. याशिवाय 1.9k यूजर्संनी हा व्हिडिओ रीट्वीट केलं आहे. जंगलात फिरणाऱ्या या काळ्या पँथरचा व्हिडिओ पर्यटकांनी त्यांच्या सफारी जीपमधून शूट केला आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करताना यातील एका पर्यटकांने पहिल्यांदाच ब्लॅक पँथर पाहिला असल्याचं म्हटलं आहे. (हेही वाचा - Chirag Paswan Viral Video: वडील रामविलास पासवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुलगा चिरागने केली रिहर्सल; पहा व्हायरल व्हिडिओ)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सफारी जीपमधून पर्यटक व्हिडिओ शूट करत असताना ब्लॅक पँथर एकटकपणे पाहत असल्याचं दिसत आहे. यानंतर, तो तेथे काही वेळ उभा राहिला. त्यानंतर रस्त्यावर थोड्यावेळ थांबून जंगलात गायब झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटीझन्सनी मजेदार प्रतिसाददेखील दिल्या आहेत.

एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, या दुर्मीळ मांजरीचे रक्षण करण्यासाठी प्रवीण तुम्ही आणि आपल्या टीमने महत्त्वाचे पाऊल उचलले पाहिजे. विशेष म्हणजे प्रवीण कास्वान यांनी एका वेगळ्या ट्वीटमध्ये ब्लॅक पँथर भारतातील अनेक राज्यांमध्ये आढळल्याचे नमूद केले आहे.