Raghu Dosa Wala Flying Vada Pav: दक्षिण मुंबई मध्ये थक्क करणार्‍या अंदाजात 'वडापाव' बनवणार्‍या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडीयात  वायरल (Watch Video)
Flying Vada Pav (Photo Credits: Video Screengrab/ YouTube)

मुंबईकरांसाठी 'वडा पाव' ( Vada Pav) हा केवळ झटपट खाण्याचा एक पदार्थ नाही तर त्याच्यासोबत अनेक भावना जोडल्या जात आहेत. मुंबई शहरामध्ये नाक्या नाक्यावर तुम्हांला वडापावच्या गाड्या दिसतील. यामध्ये अनेकांची देशा-परदेशात ओळख आहे. दरम्यान वडा पाव बनवण्याची प्रत्येकाची रेसिपी सारखीच वाटत असली तरीही प्रत्येकाची चव वेगवेगळी आहे. आणि मुंबई मध्ये चक्क एक वडापाव वाला ग्राहकांना देण्यापूर्वी तो हवेमध्ये खास अंदाजामध्ये टॉस देखील करतो. सोशल मीडीयामध्ये सध्या त्याचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार या वडापाव वाल्याचं नाव रघू डोसा वाला (Raghu Dosa Wala Flying Vada Pav) आहे. सध्या त्याच्या वायरल व्हिडीओ मधील अदा पाहून नेटकरी खूष झाले आहेत. Ice Cream Pav Video: मुंंबईच्या वडापाव ला टक्कर देणार गुजरातचा आईस्क्रीम पाव? 'हा' व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले.

काही दिवसांपूर्वी फ्लाईंग़ डोसाचे व्हिडिओ वायरल झाले होते आणि आता फ्लाईंग वडा सोशल मीडियात धूम करत आहे. हा रघू डोसा वाला दक्षिण मुंबई मध्ये बोरा बाजार स्ट्रीट वर आहे. येथे त्याचे 60 वर्ष जुने दुकान आहे. फ्लाईंग वडा सोबतच त्याचे डोसा, ईडली वडा, पनीर आणि मसाला वडा पाव असे अनेक लोकप्रिय पदार्थ आहेत.

फ्लाईंग वडा व्हिडीओ

आमची मुंबई या युट्युब चॅनेलवरून रघूचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. रघू एका हाताने वडा हवेत उडवतो आणि दुसर्‍या हाताने पकडतो त्यामुळे अवघ्या काही क्षणांमध्ये होणारा हा प्रकार खवय्यांसाठी थक्क करणारा आहे. वडा तो स्पायसी पाव सोबत सिमला मिरची, पनीर, कोबी ग्राहकांना देतो. तर या अनोख्या वडापावची किंमत 15 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.