Video: बायकोला माराहण कशी करावी? कतार येथील व्यक्तिकडून YouTube वर प्रशिक्षणाचा व्हिडिओ पोस्ट
Al-Aziz Al-Khazraj Al-Ansari | (Photo Credit : Youtube)

स्त्री-पुरुष समानतेच्या आपण कितीही गप्पा मारत असलो तरी केवळ भारतच नव्हे तर, जगभरातही असे अनेक पुरुष आहेत. ज्यांना वाटते की स्त्रीने खास करुन पत्नीने आपल्या कह्यात राहायला हवे. या विचारांचा अतिरेक काही लोकांमध्ये इतका ठासून भरला आहे की, कतार (Qatar) येथे राहणाऱ्या एका व्यक्तिने पत्नीला कशी मारहाण करावी याचे प्रशिक्षण देणारा एक व्हिडिओ युट्यूब (YouTube) चॅनलवर पोस्ट केला आहे. अजीज अल-खाजराज (Abad Al-Aziz Al-Khazraj Al-Ansari) असे या व्यक्तिचे नाव असून तो पुरुष आहे.

या व्हिडिओमध्ये अजीज अल-खाजराज मुस्लिम पुरुषांना सांगतो की, 'आपल्या घरात लीडर कसे बनावे. तसेच, आपल्या पत्नीवर कसे प्रभुत्व मिळवावे. तिला कशी शिक्षा करावी.' हा व्हिडिओ सुरु होताच हा व्यक्ती सांगतो की, 'प्रिय प्रेक्षक, खास करुन ते लोक जे विवाहीत आहेत. आज आपण जाणून घेऊया की आपल्या पत्नीला कशी मारहाण करावी. पण, खरोखरच पत्नीला मारहाण करणे गरजेचे आहे. एका पुरुषाने आपल्या पत्नीला दररोज मारहाण केली पाहिजे? नाही'

अजीज अल-खाजराज व्यक्ती व्हिडिओमध्ये सांगतो की, 'पत्नीला आपल्या पतीच्या ताकदीची माहिती व्हायला हवी. जेणेकरुन पतीच्या अज्ञेशिवाय तिने घराबाहेरही नाही जायला पाहिजे. पत्नीने तसे केले तर पतीने तिला वेळीच रागे भरले पाहिजे. असे करताना पत्नी काही उलटे बोलू शकेन. अशा वेळी तिला धडा शिकविण्यासाठी तिला चोप (मारहाण) द्यायला हवा. पण, तिला चोप देताना नुसताच चोप देऊ नये तर, पत्नीला याची पुरेपूर खात्री पटली पाहिजे की, आपला पती मर्द आहे', असे आकलेचे तारेही अजीज अल-खाजराज व्हिडिओत तोडताना दिसतो. (हेही वाचा, बायकोचा सेक्स व्हिडिओ नवऱ्याने पाहिला, मुलांसमोर झाडल्या गोळ्या)

व्हिडिओत हा व्यक्ती सांगतो आहे की, 'कोणत्याही पतीने आपल्या पत्नीला आगोदर ओरडले पाहिजे. त्यानंतरच तिला मारहाण करण्यास सुरुवात केली पाहिजे. पत्नीला कशी मारहाण करावी हे इस्लाममध्ये सांगितले आहे', असा दावाही अजीज अल-खाजराज व्यक्ती व्हिडिओत करतो. पुढे हा सांगतो की, 'पत्नीला अशा पद्धतीने मारहाण करायला हवी की, जेणेकरुन तिच्या शरीरातून रक्त येऊ नये. तिला वेदना होऊ नये तसेच तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे व्रण उठू नये. ' (हेही वाचा, धक्कादायक! बायको दहा मिनिटे घरी उशिरा आली, नवऱ्याने दिला तलाक)

अजीज अल-खाजराज महाशय म्हणतात की, 'पहिल्यांदा आपण हे समजून घेतले पाहिजे की, पुरुष हा घरातील प्रमुख असतो. ज्याच्याजवळ अधिकार असतात. अगदी एखाद्या कंपनीच्या मॅनेजर प्रमाणे. घरातील पत्नीने कसे वागावे आणि तिचे जीवन पुढे कसे असावे याचा निर्णय पुरषानेच घ्यायचा असतो. त्यामुळे नियमांच्या चौकटीत राहूनच पतीने पत्नीला मारहाण करावी', असेही ज्ञान हा गृहस्थ पाजळताना व्हिडिओत दिसतो. प्रसारमाध्यमांनीही या व्हिडिओची गंभीर दखल घेऊन त्यावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे.

अजीज अल-खाजराज महाशय प्रशिक्षण देताना व्हिडिओ

दरम्यान, अत्यंत सुमार आणि तद्दन फालतू अशा या व्हिडिओत अजीज अल-खाजराज या व्यक्तिसोबत एक लहान मुलगाही दिसतो आहे. जो त्याचे बोलने ऐकून हसतो आहे. हा व्यक्ती त्या मुलाला पत्नीला मारहाण करण्याचे आणि खरा मर्द कसे बनावे याचे प्रशिक्षण देत आहे. आतापर्यंत पाच लाखाऊन अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून या व्यक्तीच्या आकलेच्या ताऱ्यांवर युजर्सनी त्याला चांगलेच सुनावले. मात्र, व्हिडिओ पाहून विरोधी प्रतिक्रियांचे प्रमाण वाढल्यानंतर व्हिडिओखाली आलेल्या प्रतिक्रिया डिसेबल करण्यात आल्या आहेत.