
लोकसभेत नुकतेच ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. तरीही या विधेयकाच्या काही आठवड्यानंतर उत्तर प्रदेशात (Utter Pradesh) एटा जिल्ह्यात ट्रिपल तलाक (Triple Talaq) संबंधित धक्कादायक घटना घडली आहे.
एटा जिल्ह्यात राहणारी पीडित महिला माहेरी तिच्या आजीची प्रकृती ठिक नसल्याने विचारपूस करण्यास गेली होती. तसेच बायकोने नवऱ्याला मी अर्ध्या तासात पुन्हा घरी येते असे सांगून घराबाहेर गेली. परंतु जेव्ही ती पुन्हा घरी आली त्यावेळी अर्धा तास होऊन दहा मिनिटेच झाली होती. यामुळे नवऱ्याला राग येऊन तिला तलाक दिला आहे. तसेच भावाच्या मोबाईलवरुन बायकोला फोन करत त्यावरुनच तिला तलाक देत असल्याचे सांगितले. तलाक दिल्याचे हे ऐकून बायकोला धक्का बसला.
पीडित महिलेने सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच सासरची मंडळी मारहाण करतात असा ही आरोप लावला आहे. माहेरच्या मंडळींनी हुंडा दिला नाही या कारणावरुनही सारखे तिला शिवीगाळ करतात. मारहाण केल्याने तिला गर्भपात करावा लागल्याची धक्कादायक बातमी तिने पोलिसांना सांगितली आहे.