Noida Viral Video: नोएडा (Noida) मध्ये गार्डने गेट उघडण्यास उशीर केल्याने एक महिला भलतीचं संतप्त झाली. या महिलेने गार्डला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला गार्डवर भडकताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर महिलेवर टीका होत आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओ नोएडाच्या सेक्टर 126 च्या जेपी सोसायटीचा आहे. जिथे एका गार्डला गेट उघडण्यास थोडा विलंब होतो. हे पाहून त्या महिलेला गार्डचा राग येतो. ती महिला गार्डसोबत गैरवर्तन करू लागते. ती गार्डला अश्लील शिव्या देते. व्हिडीओमध्ये ती महिला तिथे उपस्थित असलेल्या इतर रक्षकांनाही शिवीगाळ करताना दिसत आहे. ती एका रक्षकाला ढकलताना आणि धक्काबुक्की करतानाही दिसते. तिथे उपस्थित असलेल्या एका गार्डने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (हेही वाचा -Dahi Handi 2022: गोविंदाला 23 व्या वेळीही फुटली नाही दहीहंडी; नेटीझन्स म्हणाले, आता हे मटके बनवणाऱ्या कुंभाराला शोधावं लागेलं; Watch Viral Video)
उक्त प्रकरण में अभियोग पंजीकृत कर अग्रिम विधिक कार्यवाही की जा रही हैl
— DCP_Noida (@DCP_Noida) August 21, 2022
महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही याप्रकरणी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मालीवाल यांनी लिहिलं आहे की, 'ही महिला खुलेआम या गार्डला इतक्या गुंडगिरीने शिवीगाळ करत आहे. ही कसली असभ्यता आहे? नोएडा पोलिसांनी या महिलेवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.'