Pink Dolphin Viral Video: समुद्रात दिसला गुलाबी रंगाचा डॉल्फिन; पहा विलोभनीय दृश्यं
Pink Dolphin Viral Video (Photo Credits: Twitter)

जंगल आणि जंगली जनावरांचे जीवन अत्यंत खास असते. त्याचप्रमाणे समुद्री जीवांचे देखील वेगळे विश्व असते. डॉल्फिनचे अनेक व्हिडिओज यापूर्वी तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. परंतु, तुम्ही कायम एकाच रंगाचा डॉल्फिन (Dolphin) पाहिला असेल. सध्या समोर आलेल्या व्हिडिओत चक्क गुलाबी रंगाचा डॉल्फिन (Pink Dolphin) दिसत आहे. कदाचित हे ऐकून तुम्हाला खरं वाटणार नाही. पण हा व्हिडिओ (Video) सध्या जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. हे विलोभनीय दृश्यं पाहून तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल.

भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, "तुम्ही असा डॉल्फिन कधी पाहिला नसेल." आतापर्यंत या व्हिडिओला 49.1K व्ह्युज मिळाले असून 728 लोकांनी रिट्वीट केला आहे. तर 4,964 लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. (Dolphin Hug Viral Video: डॉल्फिन ने मारली पाणबुड्याला मिठी; पहा मानव आणि प्राण्यातील प्रेमाचा 'हा' अनोखा व्हिडिओ)

पहा व्हायरल व्हिडिओ:

व्हिडिओत तुम्ही पाहु शकाल, समुद्रात एक डॉल्फिन मासा खूप मस्ती करत आहे. हा इतर डॉल्फिन पेक्षा खूप वेगळा आहे. कारण त्याचा रंग गुलाबी आहे. वेगळ्या रंगामुळे त्याचे सौंदर्य खुलले असून तो लक्षवेधी ठरत आहे. हा वेगळा डॉल्फिन पाहिल्यानंतर लोक त्यावर भरपूर प्रतिक्रीया देत आहेत. असा डॉल्फिन कधी पाहिला नाही, असे अधिकांश लोकांचे म्हणणे आहे.