Dolphin Hug Viral Video: डॉल्फिन ने मारली पाणबुड्याला मिठी; पहा मानव आणि प्राण्यातील प्रेमाचा 'हा' अनोखा व्हिडिओ
Dolphin Hug Viral Video (PC - Twitter)

Dolphin Hug Viral Video: प्रेमाला भाषा नसते, असं म्हटलं जात. हे अगदी खर आहे. कारण, सध्या सोशल मीडियावर असाचं एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात याचा प्रत्यय येतो. तुम्ही आतापर्यंत डॉल्फिनचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. मात्र, कधी डॉल्फिनने मानवाला मिठी मारतानाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे का? या प्रश्नाचं उत्तर नाही असले. मात्र, सध्या सोशल मीडियावर असाचं एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात डॉल्फिन एका पाणबुड्याला मिठी मारताना दिसत आहे.

डॉल्फिन आणि पाणबुड्यातील हे प्रेम पाहून नेटीझन्स हैराण झाले आहेत. या व्हिडिओवर आतापर्यंत अनेक नेटीझन्सनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. आयएफएस सुशांत नंदा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना सुशांत नंदा यांनी 'Love wrapped up within a hug' असं कॅप्शन दिलं आहे. (वाचा - महाराष्ट्रातील बुलढाण्यात रस्त्याच्या मधोमध साप आणि मुंगूस यांचे जोरदार भांडण; Viral Video मध्ये बघा कोण कोणावर पडले भारी)

दरम्यान, सुशांत नंदा यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ अनेक यूजर्संनी शेअर केला आहे. तसेच अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील एका यूजर्सने म्हटलंय, 'प्रेमळ मिठी.' यापूर्वी प्राणी आणि मानव यांच्यातील प्रेमाचे तसेच प्रामाणिकतेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये प्राण्यांचे मानवाप्रती असलेल्या प्रेमाचा वारंवार प्रत्यय आला आहे.