महाराष्ट्रातील बुलढाण्यात रस्त्याच्या मधोमध साप आणि मुंगूस यांचे जोरदार भांडण; Viral Video मध्ये बघा कोण कोणावर पडले भारी
Photo Credit: Youtube

Snake Vs Mongoose: साप(Snake)आणि मूंगुस यांची दुश्मनी जगजाहीर आहे.जेव्हा दोघांच्या मध्ये भांडण होते तेव्हा भले साप किती ही विषारी असुदेत पण जिंकते मूंगुसच. तुम्ही ही आतापर्यंत सोशल मीडियावर साप आणि मुंगूस यांच्या भांडणाचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील.याच दरम्यान या दोघांच्या भांडणाचा आणखिन एक व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे.ज्यात विषारी साप आणि शिकारी मुंगूस यांच्या दरम्यान रस्त्यावर प्रचंड घमासान भांडण होत आहे. या दरम्यान सर्वात मनोरंजक बाब म्हणजे रस्त्याच्या कडेला उभे असणारे लोक साप आणि मूंगुस चे हे भांडण लाईव्ह बघत उभे होते. महाराष्ट्रातील(Maharashtra) बुलढाण्यातील (Buldhana ) येथील रस्त्यावर साप आणि मुंगूस यांचा भांडणाचा हा व्हिडिओ बऱ्याच लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

टीव्ही 9 मराठी या वाहिनी नुसार, ही घटना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील आहे, जिथे रस्त्यावर साप आणि मुंगूस यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले. या दोघांमधील हा संघर्ष बराच काळ टिकला. कधी साप मुंगूसवर हल्ला करताना दिसला तर कधी मुंगूस सापांवर जोरात पडताना दिसला. तथापि, या लढाईत कोण कोणावर भारी पडले हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पहावा लागेल.

व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की साप आणि मुंगूस रस्त्यावर एकमेकांना कसे भांडत आहेत, जे एकमेकांचे सर्वात मोठे शत्रू मानले जातात. काही लोक साप आणि मुंगूसपासून खूप दूर उभे आहेत, जे त्यांचे भांडण अत्यंत उत्सुकतेने पाहत आहेत. साप त्याच्यासमोर मुंगूस पाहतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु मूंगुसाने त्याच्यावर जागीच हल्ला केला. यानंतर, साप देखील फणा पसरवतो आणि मुंगूस ला सामोरे जातो. दोघांमधील भांडण बराच वेळ चालू राहते, भांडणाच्या शेवटी, शिकारी मुंगूस साप ला फेकून देता .