Fake news about financial aid under Pradhan Mantri Balika Anudan Yojna (Photo Credits: PIB fact Check)

सध्या एका पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात गरीब बीपीएल (BPL) श्रेणीतील कुटुंबीयांना त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी (Daughter's Marriage) 50 हजारांची रक्कम दिली जाईल असं सांगण्यात आलं आहे. यासाठी केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' (Pradhan Mantri Balika Anudan Yojna ) आहे असे देखील सांगण्यात आले आहे मात्र सरकारकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. सरकार अशाप्रकारे कोणतीच योजाना सुरू करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान व्हायरल वृत्तामध्ये बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी सरकार 50 हजारांची आर्थिक मदत करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यासाठी सरकारची 'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' असेल पण PIB Fact Check कडून मात्र अशी कोणतीही सुविधा नसल्याचं सांगण्यात आलं आहे. ट्वीटरवर PIB Fact Check अकाऊंटवरून त्यांनी हा खुलासा केला आहे.

इथे पहा दावा आणि PIB Fact Check  कडून देण्यात आलेलं स्पष्टीकरण  

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री कन्या आयुष योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Kanya Ayush Yojana) प्रत्येक मुलीला 2000 रुपये देण्यात येत आहेत. असा दावा करणारा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत होता तो देखील खोटा असल्याचं PIB Fact Check अकाऊंटवरून स्पष्ट करण्यात आलं होतं.