Mobile Phone Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोविड 19 संकटामध्ये आता सारेच कॅशलेस व्यवहार करत असताना अनेकजण पेटीएम (Paytm), गूगल पे (Google Pay), फोन पे (PhonePe ) यांच्या द्वारा व्यवहार करतात. डिजिटल व्यवहार जसे वाढले तसे फ्रॉड करणार्‍यांची संख्या वाढली आहे.त्याच्या अनेक बातम्या आता समोर येत आहेत. सध्या एक महिला दुकानदाराला गंडवताना रेड हॅन्डेड पकडलं आहे. ही महिला स्पुफ पेटीएम अ‍ॅप बनवून लोकांची फसवणूक करत होती. पेटीएम सारखे दिसणारेच 'Paytm Spoof' ती वापरत होती.  हे देखील वाचा: Paytm Payment Bank ला मिळाली रिजर्व्ह बँकेची मान्यता .

व्हिडिओ मध्ये दिसत असल्या प्रमाणे तिने काही डिटेल्स टाकत व्यवहार झाल्याचे खोटे नोटिफिकेशन आल्याचं पहायला मिळत आहे. हे इतके खरं वाटतं की समोरच्याला व्यवहार झाल्यासारखं वाटतं. पण वास्तवात कोणताही व्यवहार झालेला नसतो. हे देखील वाचा: Online Fraud Case: रायगड मध्ये 55 वर्षीय व्यक्तीची ऑनलाईन खरेदी दरम्यान 2.83 लाखांची फसवणूक.

इथे पहा व्हिडिओ

भारतामध्ये अशाप्रकारे अनेक व्यवहार आणि त्यामधून सामान्यांची फसवणूक झाली आहे. प्रत्येक व्यवहारानंतर तुमचा अकाऊंट बॅलेंस चेक करत रहा. बॅंकेकडून व्यवहाराची माहिती देणारा मेसेज तपासून तुमची फसवणूक टाळा.

मागील काही महिन्यात पेटीएम स्पूफ अ‍ॅप वर फसवणूक होण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला ऑनलाईन व्यवहार करताना सज्ग राहणं आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात अशा आर्थिक व्यवहारांद्वारा फसवणूकीमध्ये मोठी वाढ झाल्याच पहायला मिळालं आहे.