आपल्या मुलीची सुरक्षा हा कोणत्याही आई-वडिलांसाठी काळजीचा विषय. एका पाकिस्तानी वडिलांनी (Pakistani Father) अतिकाळजीपोटी भलताच प्रताप केला आहे. या वडिल महोदयांनी आपल्या मुलीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी चक्क तिच्या डोक्यावर सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) लावला आहे. वडिलांनी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अंमलात आणलेला अपारंपरिक दृष्टिकोन सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Pakistani Viral Video) झाला आहे. ज्यामुळे पालक आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी किती टोकाला जातात किंवा विचार करतात हे पुढे आले आहे.
वडिलांच्या कृतीवर मुलीची प्रतिक्रिया
एक्स (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) वर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मुलीची मुलाखत घेताना दिसून येतो. ज्यामध्ये पाहायला मिळते की, तिच्या डोक्यावर एक मोठा सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. मुलाखतीदरम्यान, तिने स्पष्ट केले की तिच्या वडिलांनी तिच्या हालचालिंचा मागोवा घेण्यासाठी आणि तिची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कॅमेरा बसवला होता. जेव्हा तिला विचारले गेले की तिने कॅमेराला आक्षेप घेतला आहे का, तेव्हा ती म्हणाली की तिने तसे केले नाही. तिने पुढे सांगितले की तिचे वडील तिचे "सुरक्षा रक्षक" म्हणून काम करतात. कॅमेराद्वारे तिच्यावर नजर ठेवतात. कराचीमध्ये झालेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर मुलीच्या पालकांकडून हा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत असलेल्या तिच्या पालकांनी अशा प्रकारच्या शोकांतिका पुन्हा घडू नयेत म्हणून ही कल्पक कल्पना अंमलात आणली. (हेही वाचा, UP: कर्मचाऱ्याने पोळीवर थुंकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेस्टॉरंट मालकाला अटक)
डोक्यावर CCTV कॅमेरा घेऊन मुलीने दिली प्रतिक्रिया
next level security pic.twitter.com/PpkJK4cglh
— Dr Gill (@ikpsgill1) September 6, 2024
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. "नेक्स्ट लेव्हल सिक्युरिटी" या कॅप्शनसह सामायिक केलेल्या या व्हिडिओने जवळजवळ 17,000 व्हिव्ह्ज आणि असंख्य टिप्पण्या जमा आल्या आहेत. अनेक वापरकर्त्यांनी विनोदाने प्रतिक्रिया दिली आहे, तर इतरांनी पद्धतीच्या व्यावहारिकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. एका युजरने व्यंग्यात्मक टिप्पणी केली," इटना डिजिटल भी नही होना था (इतके डिजिटल होण्याची गरज नव्हती)", तर दुसऱ्याने विनोद केला, " शेक्टीव्ही कॅमेरा."दुसर्या वापरकर्त्याने पद्धतीतील त्रुटीकडे लक्ष वेधले, "पिचे से मारेगा टू नाही दिखेगा (कोणी मागून हल्ला केला तर पकडण्यास सक्षम होणार नाही)."
दरम्यान, या व्हिडिओमध्ये उलटसुलट प्रतिक्रिा उमटत आहेत. खास करुन अलिकडेच कराचीमध्ये महिलांशी संबंधित घडलेल्या हिंसक घटनांमुळे स्थानिक समाजमन व्यथित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वडिलांनी गाठलेल्या टोकाचे पाऊल चर्चेचा विषय ठरले आहे.