Photo Credit: AFP

गेल्या वर्षी संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे संकट कोसळले.एवढे महीने होशऊनही कोरोना चे संकट अजुन कमी झालेले नाही. कोरोनामुळे आपल्या नेहमीच्या जडणघडणातील बऱ्याच गोष्टी बदलल्या. यात प्रत्येकाने स्वतःला काही बंधने ही घातली. ज्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Social Distancing. सामजिक अंतर या नियमामुळे आपोआपच मोठ मोठे सोहळे आणि कार्यक्रमांवर बंधन आली. यात लग्न सोहळ्यांचा ही समावेश झाला. त्यामुळे आता लग्न समारंभात कमीत कमी 50-100 माणसांपर्यंत परवानगी देण्यात आली. (साडी नेसून महिला मारते कोलंटी उड्या आणि करते धमाकेदार स्टंट ; Video पाहून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का )

हे नियम फक्त भारतापुरतेच मर्यादित नसून भारताबाहेर ही कोरोना च्या दिवसात काळजी म्हणून उपाययोजना केली जात आहे.त्याचेच एक उदाहरण देण्यासारखी घटना पाकिस्तान मधील कराची या भागत घडली आहे.पाकिस्तानातील कराची येथे नुकतेच 50 हिंदू जोडप्यांचा सामुहीक विवाह पार पडला.  ( World's Dangerous Selfie Spots: जगातील 'या' सर्वात धोकादायक सेल्फी पॉइंट बद्दल तुम्हाला माहीत आहेत का? )

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्या दरम्यान उपस्थितांची आणि जोडप्यांची संख्या कमी ठेवण्यात आली होती.पाकिस्तान मध्ये हिंदूंची संख्या फार कमी. पकिस्तानमध्ये 97 टक्के मुस्लिम आहेत तर 2 टक्के हिंदू आहेत. या आधीही पकिस्तानमध्ये हिंदू सामूहिक विवाह सोहळे करण्यात आलेले आहेत.