साडी नेसून महिला मारते कोलंटी उड्या आणि करते धमाकेदार स्टंट ; Video पाहून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का 
Photo Credit : Instagram

काही दिवसांपासून सोशल मीडियावरएका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो खूप पसंत केला जात आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये साडी नेसलेली एक मुलगी दिसत आहे.आणि साडी नेसून ही मुलगी चक्क स्टंट करताना पहायल मिळतेय. ती मुलगी हवेत कोलांटी उडी मारताना आपल्याला दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहे. (Snake Fight Viral Video: नागिन सापाला भुरळ घालण्यासाठी दोन विषारी साप आपसात भिडले; पहा जबरदस्त लढाईचा व्हायरल व्हिडिओ )

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ जिमनॅस्ट आणि फिटनेस मॉडेल पारुल अरोराचा आहे. जी साडीमध्ये बॅकफ्लिप करताना दिसत आहे.या आधीही पारुलचा एक व्हिडिओ खुप व्हायरल झाला होता ज्यात तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती.आणि साडी नेसून ती स्टंट ही करत होती.ज्या व्हिडीओमध्ये तिच्या बरोबर तिचा एक पार्टनर ही दिसला होता.आणि दोघांनीही त्यात बॅकफ्लिप केले होते.जो व्हिडिओ पारुल ने तिच्या इंस्टाग्राम वर शेअर करत ' 'साडीमध्ये हा स्टंट कोण करु शकत?'अस कॅप्शन लिहिले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parul_Arora💫 (@parul_cutearora)

पारुल च्या या स्टंट ला आतापर्यंत लाखो लाइक्स मिळाले आहेत. पारुलच्या साडीत केलेल्या स्टंटमुळे लोक आश्चर्यचकित झाले आहेत. साडीमध्ये असे स्टंट कोणीही करू शकते यावर विश्वास ठेवणे कोणालाही अवघड आहे.मात्र पारुल नेहमीच असे व्हिडिओ तिच्या सोशल साइटवर शेअर करत असते.