Snake Fight Viral Video: नागिन सापाला भुरळ घालण्यासाठी दोन विषारी साप आपसात भिडले; पहा जबरदस्त लढाईचा व्हायरल व्हिडिओ
दोन सापांची लढाई (Photo Credits: Facebook)

Snake Fight Viral Video: सोशल मीडियावर सापांचे (Snakes) अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. मात्र, तुम्ही कधी दोन विषारी साप (Venomous Snakes) एकमेकांशी भांडताना पाहिले आहेत का? यापूर्वी तुम्ही सापाची लढाई पाहिली असेल, पण नागिनीला मिळवण्यासाठी दोन सापांची लढाई (Snake Fight) तुम्ही अद्याप पाहिली नसेल. सध्या सोशल मीडियावर अशा दोन विषारी सापामधील जबरदस्त भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात हे दोन साप नागिन सापाला आमिष दाखवण्यासाठी लढाई करत आहेत. दोन्ही साप दोरीप्रमाणे एकमेकांना चिकटून ही लढाई लढत आहेत. सापच्या लढाईचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया वापरकर्तेही चकित झाले आहेत.

हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियन वन्यजीव संरक्षण संस्थेने (Australian Wildlife Conservancy) शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हे स्कोटिया वन्यजीव अभयारण्यात हे मुल्गा साप एका तासापेक्षा जास्त वेळ लढाई करताना दिसले, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मुल्गा प्रजातीचे साप मोठ्या प्रमाणात आढळतात. याशिवाय या प्रजातीचे साप सर्व खंडात आढळतात. (वाचा - OMG! सापाच्या डोक्यावर लावले वापरलेले Condom, श्वास घेण्यास मुश्किल झाल्याने तडफडू लागला साप, वाचा काय घडले पुढे?)

हे दोन विषारी मुल्गा साप एकमेकांवर वर्चस्व मिळविण्याच्या कशा पद्धतीने लढाई करत आहेत. हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. ऑस्ट्रेलियन संग्रहालयाच्या मते, वसंत ऋतुच्या सुरुवातीस नर साप एकमेकांशी कुस्ती करतात. वसंत ऋतूच्या सुरुवातीस या जातीचे नर साप दिसतात. लढाई करून ते मादी सापाला आमिष दाखविण्याचा प्रयत्न करतात.