एवढी आहे या बुटांची किंमत...ऐकून थक्क व्हाल!
ह्यूमन स्‍क‍िन बूट(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
फॅशनच्या दुनियेत कधी कोणता ट्रेंड येईल याचा काही नेम नाही. त्यामुळे आता बाजारात एक नव्या बुटांचा ट्रेंड फार फॅशन प्रेमींच्या पसंतीस पडत आहे. तर या बुटांची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हायला होईल.
कॅनडाच्या ब्रँड फीकल मॅटर या प्रसिद्ध ब्रँडने अंगाच्या रंगाप्रमाणे बुट बनविले आहेत. तर त्याला 'ह्युमन स्किन बुट' असे नाव देण्यात आले आहे. तर या बुटाची डिझाईन ही एका राक्षसांच्या जमाती सारखी याची प्रतिकृती आहे. तसेच या बुटाची किंमत 7.4  लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे हे बुट घातल्यानंतर पायाचे हाड वाढल्यासारखे दिसून येते. मात्र या बुटाच्या प्रतिकृतीची रचना फोटोशॉपवरुन घेण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

Merry Christmas Humans!

A post shared by Fecal Matter (@matieresfecales) on

हॅनाह रोज डाल्टन आणि स्टीवन राज भास्करण या दोघांनी बुटाचे डिझाईन बनविले आहे.तसेच या बुटासाठी स्पेशल बुकिंग करण्यात येते. तर प्रत्येक व्यक्तीच्या अंगाच्या रंगाप्रमाणे या पद्धतीचे बुट बनविले जात असल्याचे डिझायनर यांनी सांगितले आहे.