
सध्या सोशल मिडियावर (Social Media) अनेक मजेशीर व्हिडिओ अगदी वा-याच्या वेगाने व्हायरल होत आहेत. प्रत्येक पती आपल्या बायकोच्या धाकात असतो असे अनेकदा कानांवर ऐकायला मिळते. कधी गंमत म्हणून तर कधी गंभीर म्हणून पण लग्न झाल्यावर पुरुष बायकोच्या मुठी राहतो असे अनेकदा ऐकायला मिळते. मात्र ह्या गोष्टीची प्रत्यक्ष अनुभती पाहायला मिळाली ती सोशल मिडियावर व्हायरल (Viral Video) झालेल्या या व्हिडिओमध्ये... या व्हिडिओमध्ये एक आजोबा (Grand Father) डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचताना दिसत आहे. मात्र थोड्या वेळाने त्यांच्या बायकोचे म्हणजेच आजीबाईंचे आगमन झाले आणि मग जे झाले ते पाहून तुमचेही डोळे चक्रावतील.
झाले असे की कुठच्या तरी गावात सार्वजनिक समारंभ सुरु होता. तेथे डीजेच्या गाण्यावर सर्वजण ताल धरताना दिसत आहे. तेथे एक आजोबाही बेधुंद होऊन नाचताना दिसत आहे. मात्र त्यांना पाहून त्यांच्या कारभारीणीचा म्हणजेच आजीबाईंचा पारा चढला आणि त्यांनी पुढे काय केले ते पाहा
आज्जीचा दरारा आणि आजोबा गायब... 😂😂😂 #साभार pic.twitter.com/Gh7sAuLxJt
— किरण... (@Coolkiranj) January 14, 2021
आजोबांना नाचताना पाहून आजीबाई समोरून हातात काठी घेऊन आल्या आणि त्यांना पाहून आजोबांचा थरकापच उडाला. आजीबाईंना पाहून त्यांनी तेथून पळच काढला. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ नेमका कुठला हे समजू शकलेलं नाही, पण आजीचा दरारा आणि आजोबा गायब अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.