कोरोना संकट भारतामध्ये मागील दीड वर्षांपासून धुमाकुळ घालत आहे. या काळात घराबाहेर पडू नका, आरोग्याची काळजी घ्या या सूचनांचा घोषा सुरू असल्याने नागरिकांच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेत काही चूकीच्या बातम्या, खोटं वृत्त झपाट्याने पसरवलं जात आहे. सध्या आरोग्य संकटासोबतच नागरिकांना अशा बातम्यांपासून दूर ठेवण्यासाठी देखील प्रशासन आणि सरकारी यंत्रणा काम करत आहे. पुन्हा देशात महाराष्ट्रासह अनेक महत्त्वाच्या राज्यांत मिनी लॉकडाऊन सुरू झाल्याने परीक्षांवर गंडांतर येणार का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. दरम्यान सध्या NEET-PG 2021 च्या जाहीर करण्यात आलेल्या प्रोव्हिजन परीक्षांच्या तारखा देखील रद्द केल्याच्या बातम्या सोशल मीडियामध्ये झपाट्याने पसरत आहेत. पण परीक्षा स्थगित किंवा रद्द करण्यात आली नसल्याचं सांगत सोशल मीडीयात एक मोर्फ़ इमेज वायरल होत असल्याचं पीआयबी फॅक्ट कडून सांगण्यात आले आहे.
यंदा 18 एप्रिल दिवशी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन कडून नीट पीजीच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर वायरल मेसेज मध्ये National Board of Examination च्या लेटरहेड वर यंदाची ही परीक्षा स्थगित करण्यात आली असून लवकरच पुढील तारीख कळवली जाईल असा दावा करण्यात आला आहे. पण हे वृत्त खोटं असल्याचं पीआयबीने ट्वीटरच्या माध्यमातून कळवलं आहे. कर्मचारी निवड आयोगाच्या बनावट अकाउंट पासून रहा सावध, PIB Fact Check कडून सत्यता समोर.
PIB Fact Check
A morphed notice being shared on social media claims that the provisional schedule for NEET-PG 2021 announced by National Board of Education stands deferred till further notice. #PIBFactCheck: This notice is #fake. No such notice has been issued by #NBE. pic.twitter.com/J7zbNNYgze
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 6, 2021
दरम्यान वेळापत्रकानुसार, नीट पीजी परीक्षा 18 एप्रिल दिवशी देशभर विविध केंद्रांवर होणार आहे. त्यानंतर 31 मे पर्यंत त्याचा निकाल हाती येऊ शकतो. ही परीक्षा कम्युटर बेस्ड असते. मल्टिपल चॉईसचे 300 प्रश्न यामध्ये असतात. 162 शहरांमध्ये यंदा ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून मास्टर ऑफ सर्जरी, डॉकटर ऑफ मेडिसिन आणि अन्य पीजी डिप्लोमा प्रोग्राम साठी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांना सरकारी, प्रायव्हेट, डीम्ड कॉलेजमध्ये अॅडमिशन दिले जातात.