Fake News (Photo Credits-Twitter)

सोशल मीडियात सध्या एक बातमी तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, SSCorg_in एसएससीचे अधिकृत ट्विटर अकाउंट आहे. पीआयबीकडून या संदर्भात फॅक्ट चेक करण्यात आले असून व्हायरल होणारी बातमी फेक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पीआयबीने असे म्हटले आहे की, अशा पद्धतीचे कोणतेच ट्विटर हँडल नाही आहे. खोटे दावे फेटाळून लावत पीआयबीकडून एका फॅक्ट चेकमध्ये असे म्हटले आहे की, कर्मचारी निवड आयोगाचा दावा करणारे ट्विटर हँडल बनावट आहे. पीआयबीन आणखी एक स्पष्टीकरण देत असे म्हटले की, एसएससीचे कोणतेच अधिकृत ट्विटर अकाऊंट नाही आहे. त्यामुळे कोणत्याही अधिकृत माहितीसाठी कर्मचारी निवड आयोगाची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट द्या.

काही वेळेस सरकारी योजना, मंत्रालयाच्या वेबसाइटच्या बनावट साइट्स तयार करुन लोकांची फसवणूक केली जाते. अशा पद्धतीच्या काही घटना सुद्धा समोर आल्या आहेत. यासाठीच कोणत्याही बातमीला बळी पडण्यापूर्वी त्यामागील सतत्याता जाणून घ्या. कारण फेक न्यूज नागरिकांना एखाद्या फसवणूकीच्या जाळ्यात ओढू शकतात.

 

Tweet:

याआधी फेब्रुवारी महिन्यात एसएससी ट्विटर हँडल बद्दल सोशल मीडियात खुप बातम्या व्हायरल झाल्या होत्या. ज्यामध्ये असे सांगितले गेले होते की, @SSCorg_in एसएससीचे अधिकृत ट्विटर अकाउंट आहे. सोशल मीडियात अशा काही खोट्या बातम्या समोर येत आहेत की लोकांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे. सरकार आणि त्यांच्या एजंसीमधील लोक फेक बातम्यांवर आळा घालण्याचा वारंवार प्रयत्न करतात. त्यामुळे उमेदवारांनी सुद्धा विविध शासकीय मंत्रालयांच्या अधिकृत संकेतस्थळांनाच भेट द्यावी अशा सुचना दिल्या गेल्या आहेत.