नीरज चोप्रा (Photo Credit: PTI)

सूवर्णपदक विजेता नीरज चोपडा (Neeraj Chopra) याचा टोक्यो ओलंपिक (Tokyo Olympic) स्पर्धेत भालाफेक (Javelin) खेळादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडिओत नीरज चोपडा आपला भाला (Javelin) पाकिस्तानच्या अरशद नदीम (Arshad Nadeem) याच्याकडून घेताना दिसतो आहे. अरशद याच्याकडून भाला घेण्याबाबतच्या घटनेबाबत स्वत: नीरज चोपडा याने एका मुलाखतीत माहिती दिली. त्याने सांगितले की, फायनल सामन्याला जाण्यापूर्वी माझ्या लक्षात आले की माझा भालाच मला भेटत नाही. त्यामुळे मी भाला शोधण्यासाठी इकडेतिकडे पाहू लागलो. तोवर पाकिस्तानचा अरशद नदीम माझा भाला घेऊन फिरत असल्याचे माझ्या लक्षात आले.

दरम्यान, दरम्यान, नीरज चोपडाच्या या व्हिडिओवरुन अनेकांनी सोईस्कर अर्थ लावण्यास सुरुवात केली. ध्यानात येताच नीरज चोपडा याने एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, 'माझी आपणआ सर्वांना विनंती आहे की, माझ्या प्रतिक्रियेचा वापर आपण चुकीचा अजंडा पुढे वाढविण्यासाठी वापर करुन नये. खेळ ही अशी गोष्ट आहे जी सर्वांना सोबत घेऊन एकत्र राहण्यास आणि पुढे जाण्यास शिकवते. तुम्हाला माझ्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी खेळाचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

ट्विट

नीरज चोपडा याने मुलाखतीत पुढे म्हटले होते की, की, माझा भाला अरशद याच्या हातात दिसताच मी तातडीने त्याच्याकडे गेलो आणि म्हटले की, 'भाई माझा भाला मला दे.. मला भाला फेकायचा आहे.' तुम्ही पाहिले असेल फायनलला भाला फेकण्यासाठी मी काहीसा विलंबाने पोहोचलो आणि त्या वेळी मी थोडासा घाईतही होतो. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नीरजने हा किस्सा सांगितला. (हेही वाचा, Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकताच नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, जाणुन घ्या किती रक्कम मिळाली बक्षिसात)

ट्विट

दरम्यान, नीरज याने तब्बल 87.58 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला आणि इतिहास घडला. भारताला भालाफेक प्रकारात एथलेटिक्समध्ये पहिले सूवर्ण पदक मिळाले.

नीरज याने अरशद नदीम याचे कौतुक करत म्हटले की, क्वालीफाइंग राउंड सोबतच फाइनल मध्येही त्याची कामगिरी चांगली राहिली. मला वाटते की ही बाब पाकिस्तानसाठी नक्कीच चांगली आहे. त्याच्यासमोर भविष्यात भालाफेक खेळात अनेकांच्या इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे.