Naked Mother: आपल्या दोन मुलांसमोर नेहमी 'निर्वस्त्र' राहते ही महिला; सोशल मिडियावर केला खुलासा, होत आहे ट्रोल
Paige Whitney (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुलांची काळजी घेणे, त्यांना योग्य शिकवण देणे, एक उत्तम पालक (Parents) बनणे ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये प्रत्येक पालक परिपूर्ण असतीलच असे नाही. ज्या पालकांना आपल्या मुलांसाठी जे योग्य वाटते ते ते करतात. परंतु सर्वसाधारणपणे, प्रत्येक पालक ज्या योग्य गोष्टी आहे त्या मुलांवर लादण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु जगात असेही पालक आहेत जे मुलांना काही गोष्टी शिकवण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात. अशा पालकांवर कधी कधी टीकाही होते. अशीच एक आई सध्या व्हायरल होत आहे. ही आई मुलांसमोर निर्वस्त्र (Naked) राहते त्यामुळे सध्या तिला सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे.

पेज व्हिटनी (Paige Whitney) या आईने नुकतेच तिच्या टिकटॉक अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने धक्कादायक खुलासा केला आहे. पेजने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, तिला 2 सावत्र मुले आहेत. मोठ्या मुलाचे वय 3 वर्षे आहे तर लहान मुलाचे वय 1 वर्ष आहे. ती दोन्ही मुलांसमोर कपड्यांशिवाय राहते. तिने सांगितले की, या लहान मुलांसमोर कपडे घालण्याचे फार कमी प्रसंग येतात. तिने पुढे सांगितले की, तिची मुले इतकी लहान आहेत की ते एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे कोणत्याही शरीराकडे पाहत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासमोर निर्वस्त्र राहण्यास काही हरकत नाही. (हेही वाचा: ऑफिसच्या कामातून सुट्टी मिळावी म्हणून गर्भवती असल्याचे महिलेने केले नाटक, असा झाला खुलासा)

पेजने असेही म्हटले आहे की, मुले 5 वर्षांची झाल्यावर ती त्यांच्यासमोर कपडे घालायला सुरुवात करेल कारण त्यानंतर मुले सर्व गोष्टी एका वेगळ्या प्रकारे पाहण्यास सुरुवात करतील. मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांना जर का माझ्या कपडे न घालण्याबाबत समस्या असेल, तर ते मला सांगतील व मी कपडे घालायला सुरुवात करेन. महिलेने सांगितले की, मुले अजूनही इतकी लहान आहेत की त्यांना कपडे म्हणजे काय आणि शरीरात लपवण्यासारखे काय आहे हे समजत नाही.