Aquarium Manicure साठी नेल आर्टिस्ट ने वापरला जिवंत मासा; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल अचंबित
Aquarium Manicure Viral Video (Photo Credits: Instagram)

Viral Video:  हातांचे आणि नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी बहुतांश महिला मेनीक्योर (Manicure) चा आधार घेतात. यातही विविध प्रकार आहेत. त्यातील फिश मेनीक्योर हा एक अनोखा प्रकार. विशेष म्हणजे काही नेल आर्टिस्ट (Nail Artist) एक्वेरियम मेनीक्योर (Aquarium Manicure) मध्ये चक्क जीवंत माशाचा वापर करत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेल सनी (Nail Sunny) नावाच्या नेल सलोनच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आलं आहे. या व्हिडिओत नेल आर्टिस्ट एका एक्रेलिक नखातील मिनी एक्वेरियममध्ये जिवंत मासा टाकताना दिसत आहे. (126 हिऱ्यांनी साकारले जगातील सर्वात महागडे लिप आर्ट; किंमत ऐकून थक्क व्हाल!)

व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, एक नेल आर्टिस्ट ब्लू आणि सिल्वर ग्लिटर पॉलिशपासून एक नख तयार करत आहे. ते नख महिलेच्या नखावर चिकटवल्यानंतर पाण्याच्या टाकीतून एक छोटा मासा काढून नखावर तयार केलेल्या मिनी एक्वेरियममध्ये सोडत आहे. परंतु, नंतर पुन्हा त्या माशाला पाण्याच्या टाकीत सोडण्यात येते. विशेष म्हणजे हा व्हिडिओ बनवताना कोणत्याही  माशाच्या जीवास धोका पोहचलेला नाही, असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पहा व्हिडिओ:

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. माशाच्या जीवाशी खेळ केल्याचे अनेकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. तसंच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देण्यात आलेल्या स्पष्टीकरणबाबतही अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत.