126 हिऱ्यांनी साकारले जगातील सर्वात महागडे लिप आर्ट; किंमत ऐकून थक्क व्हाल!
Most Expensive Lip Art (Photo Credit : instagram)

मेकअप करायला न आवडणाऱ्या मुली दुर्मिळच असतील. मेकअप हा शब्द उच्चारताच अनेकींचा चेहरा खुलतो. मात्र काळाप्रमाणे मेकअपच्या पद्धतीतही खूप बदल झाला. नवनव्या स्टाईल्स समोर आल्या. हेअर, नेल किंवा लिप आर्ट सारख्या संकल्पना समोर आल्या. याचे नवनवे व्हिडिओज, फोटोज आपण पाहिले असतील. पण आता जगातील सर्वात महागड्या लिप आर्टचे (Lip Art) फोटोज समोर आले आहेत. या लिप आर्टने वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) केला आहे.

हे लिपआर्ट ऑस्ट्रेलियाच्या (Australia) पर्थ येथील एका मॉडेलच्या ओठांवर करण्यात आले. याची एकूण किंमत 757,975 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे  3.78 कोटी रुपये इतकी आहे. हे लिपआर्ट साकारण्यासाठी हिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. रॉडेंड्रॉफ डायमंड ज्वेलर्सचे (Craig Rosendorff) 126 हिरे एका मॉडेलच्या ओठांवर लावून मेकअप ऑर्टिस्टने नवा रेकॉर्ड केला आहे. हे लिप आर्ट पूर्ण करण्यासाठी सुमारे अडीच तासांचा कालावधी लागला.

हे लिप आर्ट पाहून तुम्हीही दंग व्हाल...

हे लिप आर्ट साकारण्यासाठी मेकअप आर्टिस्टने क्लेर मॅक काळ्या रंगाच्या लिपस्टिकचा वापर केला आहे. त्यानंतर अडीच तासांच्या मेहनतीने मॉडेलच्या ओठांवर 22.92 कॅरेटचे 126 हिरे लावण्याची किमया साधली. मात्र या काळात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.