सध्या आपल्या 'Sense of Humour' आणि 'Witty Responses' मुळे कुणी चर्चेत असलेला देशपातळीवरील राजकारणी असेल तर तो Nagaland चे मंत्री Temjen Imna Along आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ईशान्येकडील लोकांचे बारीक डोळे आणि त्याचा राजकारणी म्हणून होणारा फायदा यावरून केलेली टीपण्णी असू दे किंवा त्यांचे अनेक मजेशीर अंदाजातील ट्वीट असु दे सध्या ट्वीटर सोबतच त्यांची सोशल मीडीयात चर्चा आहे. लोकाग्रहास्तव ते लवकरच अजून एक मजेशीर व्हीडिओ पोस्ट करणार आहेत असे देखील त्यांनी सांगितले आहे.
कालच्या 'जागतिक लोकसंख्या दिनी' त्यांनी असाच एक सल्ला शेअर केला आणि त्याच्यावर लोकांचा मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता त्यांनी अभिनेता गोविंदा याचा 'इतनी खुशी' चा जिफ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी देशभरातून मिळणार्या प्रेमाचा स्वीकार करत याबद्दल मी कृतज्ञ असल्याचंही स्पष्ट केले आहे.
इतनी ख़ुशी 🤗
Humbled by all the love and support I have received from people across the country.
Thank you all for the loved showered upon me. Also, for those who are asking another video of mine, Will try to upload soon.
Grateful 🙏🏻 pic.twitter.com/gLxhBg7M7b
— Temjen Imna Along (@AlongImna) July 12, 2022
Temjen Imna यांनी 'बारीक डोळ्या'वरून एका भाषणात केलेला उल्लेख विशेष गाजला होता. सोशल मीडीयात हा व्हिडिओ शेअर झाला आणि बघता बघता वायरलही झाला होता. आसाम चे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांनी देखील तो शेअर केला होता.
लोग कहते हैं कि पूर्वोत्तर के लोगों की आँख छोटी होती है। पर छोटी आँख होने के फायदे भी हैं…
सुनिए नागालैंड बीजेपी के अध्यक्ष तेमजेन इमना अलॉन्ग को। #Nagaland #BJP #temjenimnaalong pic.twitter.com/34XZ1aMxVa
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) July 8, 2022
हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर त्यांचे ट्वीटसही गाजले. Temjen Imna या राजकारणी असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे सोशल मीडीयात फॅन्स देखील वाढले आहेत.
Ayalee, @Google search excites me.😆
I am still looking for her! pic.twitter.com/RzmmgyFFeq
— Temjen Imna Along (@AlongImna) July 10, 2022
Temjen Imna Along हे नागालॅंड राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आणि ट्रायबल अफेअर्स मिनिस्टर आहेत. 41 वर्षीय Temjen Imna Along हे नागालँड भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत ते अलंग टाकी मतदारसंघातून निवडून आले आहेत.