मुंबईच्या (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) वर काल एक भयंकर घटना घडली. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती गाडीखाली येण्यापासून थोडक्यात बचावली आहे. या व्यक्तीचा जीव आरपीएफ जवान आणि रेल्वे गार्डने वाचवला. मात्र ही थरारक घटना रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून मध्य रेल्वेने (Central Railway) याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. 'या घटनेत दोन हिरो आहेत,' असे रेल्वेने म्हटले आहे.
चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असलेला प्रवासी फरफट असताना त्याच्या मदतीला आरपीएफ जवान धावतो. या सगळ्या गडबडीत रेल्वे गार्डचाही बॅलन्स गेला. मात्र त्यावेळी आरपीएफ जवानाने त्याला बाहेर खेचले. या भयंकर घटनेनंतर तिघेही सुखरुप असल्याचे रेल्वे सांगितले आहे. (दहिसर रेल्वे ट्रॅकवर अडकलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचे मुंबई पोलिस कॉन्स्टेबलने वाचवले प्राण; पहा व्हिडिओ)
पहा व्हिडिओ:
RPF Constable and Train Guard save the life of a passenger.
There are two heroes in the incident. A passenger who tried to board a moving train 01133 Mumbai-Mangaluru special at CSMT Mumbai on 11.6.2021 and fell down. He was saved by the train Guard (1/n) pic.twitter.com/NPepAfFUPw
— Central Railway (@Central_Railway) June 12, 2021
Later, the train was stopped by station staff & Guard boarded the train. All are safe.
Railways are creating awareness through various platforms against this fatal behavioural issue and request passengers not to board/alight a moving train which is dangerous for their life. (n/n)
— Central Railway (@Central_Railway) June 12, 2021
काल रात्री मुंबई-मंगळुरू स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन सुटताना एक प्रवासी त्यात चढण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मवर फरफटू लागला. त्यावेळेस आरपीएफ जवान नरसिंग कानोजिया आणि रेल्वे गार्ड जितेंद्र पाल त्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावले. त्या व्यक्तीला चालत्या ट्रेनपासून दूर केल्यानंतर पाल यांचा बॅलन्स गेला. ते खाली पडले आणि प्लॅटफॉर्मवर फरफटू लागले. त्यावेळेस आरपीएफ जवान नरसिंग कानोजिया यांनी त्यांना सुखरुप बाजूला केले.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, "रेल्वे या जीवघेणा वर्तनाविरूद्ध विविध प्लॅटफॉर्मवरुन जनजागृती करण्याचा आणि प्रवाशांना धोकादायक वर्तनापासून परावृत्त प्रयत्न करीत आहे." तसंच चालत्या ट्रेनमधून चढणे-उतरणे धोक्याचे असल्याने असे न करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.