Kalyan: रुळ ओलांडताना रेल्वे खाली आला एक व्यक्ती, पाहा लोको पायलटने त्याचा कसा वाचवला जीव

मुंबईतील (Mumbai) कल्याण रेल्वे स्थानकात (Kalyan Railway Station) मोठा अनर्थ टळला आहे. रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी फुट ब्रिज बांधण्यात आले आहे. मात्र, तरीही काही लोक घाई-गडबडीत रेल्वे रुळ ओलांडताना दिसतात. मात्र, असे करणे धोकादायक ठरण्याची शक्यता अधिक असते. प्रवाशांनी आणि नागरिकांनी हा धोका पत्कारू नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. हे माहिती असूनही एक वृद्ध व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडत होते. दरम्यान, ती व्यक्ती समोरून येणाऱ्या रेल्वेच्या खाली आले. परंतु, लोको पायलटच्या समजुतीमुळे त्याचा जीव वाचला आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मुंबईतील कल्याण रेल्वे स्टेशनची आहे. जिथे एका प्लॅटफॉर्मवरून दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी एका व्यक्तीने प्लायओव्हरचा मार्ग निवडला. त्याचवेळी समोरून एक रेल्वे आली. मात्र, रेल्वेचालकाने त्वरीत ब्रेक लावला. ज्यामुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचला आहे. हे देखील वाचा- Viral Snake Video : अंगणात खेळत असलेल्या लहान मुलाचा पाठलाग करत किंग कोब्राचा घरात घुसण्याचा प्रयत्न

ट्वीट-

रेल्वे स्थानकावर किंवार अन्य ठिकाणी रेल्वे रुळ ओलांडणे कायदेशीर गुन्हा आहे. जर आपण असे करत असल्याचे आढळल्यास, रेल्वे संरक्षण दल किंवा जीआरपी आपल्याविरूद्ध रेल्वे अधिनियम कलम 147 अंतर्गत गुन्हा नोंदवू शकतात. त्याअंतर्गत 6 महिन्यांची तुरूंग किंवा 1000 हजार रुपये दंड करण्याची तरतूद आहे.