सोशल मीडिया (Social Media) म्हणजे ट्रेण्डचा महापूरच जणू. कधी कोणता किवर्ड ट्रेण्ड होईल आणि कशाला महत्त्व येईल नाही सांगता यायचं. त्यातही कोणत्या ट्रेण्डचा उपयोग कोण कशासाठी करेल आणि युजर्स त्याला काय प्रतिक्रिया देतील याचाही नेम नाही. मुंबई पोलीसांबाबतही काहीसे असेच घडले. सध्या युट्यूब आणि सोशल मीडियावर ट्रेण्ड असलेला #binod किवर्ड वापरुन मुंबई पोलिसांनी सायबर सुरक्षेबाबत (Cyber Security सल्ला दिला आणि युजर्सचा एकच कल्ला सुरु झाला. अर्थात मुंबई पोलीस (Mumbai Police) सोशल मीडियावरुन नेहमीच जनजागृती करत असतात. शिवाय या जनजागृतीला सोशल मीडियावर सुरु असलेल्या ट्रेण्डलाही फॉलो करतात.
#binod ट्रेण्डच्या बाबतीतही असेच घडले. आपल्यापैकी अनेक लोक कोणत्याही ऑनलाईन अकाउंटचा पासवर्ड म्हणून, स्वत:चे नाव, जवळच्या व्यक्तीचे नाव (पती, पत्नी, वडील, आई, मुंलगी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, गाव, शहर आदी.) वापरत असतात. याचाच गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार नागरिकांच्या बँक खात्यातील रक्कम वळती करतात अथवा नागरिकांच्या ऑनलाईन खात्याला इजा पोहोचवतात. माहितीची चोरी करतात. याबाबतच नागरिकांना जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी मुंबई पोलिसांनी #binod हा किवर्ड वापरला आणि ट्विटर पोस्टमध्ये म्हटले की, 'प्रिय #binod आम्हाला वाटते की, तुम्ही तुमचा पासवर्ड तुमच्या नावाचा ठेवला आहे. कृपा करुन तो बदला. कारण हा प्रकार खुप सामान्य आहे. तुमच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुंबई पोलीस ट्विट
Dear #binod , we hope your name is not your online password. It’s pretty viral, change it now! #OnlineSafety
— Mumbai Police (@MumbaiPolice) August 7, 2020
दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेला सल्ल्याचा भावार्थ ध्यानात घेतानाच ट्विटर युजर्सनी भलत्याच मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. मुंबई पोलिसांचे ट्विट रिट्विट करत एका युजर्सने म्हटले की, छे.. काय जोक करता तुमची कॉमेडी तुमच्याकडेच ठेवा. (हेही वाचा, Disclosure: 'ती' मार्गदर्शीका आमची नव्हे- मुंबई पोलीस)
— 🔱 Anshu Gupta (@anshuu0) August 7, 2020
— Atmanirbhar Matic FC🚩 (@trashkhande) August 7, 2020
दुसऱ्या एका ट्विटर युजर्सने परेश रावल यांच्या चित्रपटातील एका दृष्याच्या प्रतिमेचा वापर करत म्हटले की, 'क्या कॉमेडीयन बनेगा रे तू...', मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर आलेल्या आणखी काही प्रतिक्रिया पाहण्याठी आपण मुंबई पोलिसांचे मूळ ट्विट पाहू शकता.