केंद्र सरकारने घातली 'ई सिगारेट'वर  बंदी; सोशल मीडियात मिम्सचा पाऊस
E-Cigarettes Ban (Photo Credits: Pixabay)

केंद्र सरकारने आज भारतीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता देशात ई सिगारेट च्या उत्पन्नावर आणि विक्री बंदी घातली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, ई सिगारेटच्या विक्री, इंपोर्ट, एक्सपोर्ट, जाहिरात आणि मॅन्युफॅक्चरिंगवरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच या नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवरही कडक कारवाई केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. सध्या देशात 150 हून अधिक ई सिगारेटचे फ्लेवर्स उपलब्ध आहेत. तसेच जाहिरातीमध्ये सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी 'ई सिगारेट' फायदेशीर असल्याचा दावा केला जातो मात्र रिसर्चनुसार ई सिगारेटमुळे हे व्यसन अधिक जडतं.

ई - सिगारेट हे एक तंबाखू ऐवजी काही रसायनांचा वापर करून बनवलेलं आहे. ई सिगारेट विशिष्ट तापमानामध्ये गरम केलं की त्यामधून धूर निघतो. हा धूरदेखील मानवी आरोग्यासाठी अपायकारक असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर भारतामध्ये ई सिगारेटवर बंदी घातल्याच्या निर्णयावरूनही मिम्स बनवण्यास सुरूवात झाली आहे.

ई सिगारेट बंदी मिम्स

ई-हुक्क्यावरही सरकारने बंदी घातली आहे, असं सरकारने स्पष्ट केले. पहिल्यांदा गुन्हा केल्यास आरोपीला एका वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, दुसऱ्यांदा केलेल्या गुन्ह्यात आरोपीला पकडलं तर पाच लाख रुपयांपर्यंत दंड किंवा तीन वर्षे तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.