Mary Millben 'Om Jai Jagdish Hare' Version: दिवाळी 2020 च्या शुभेच्छा देण्यासाठी अमेरिकन गायिका मॅरी मिल्बेन ने सादर केलं 'ओम जय जगदीश हरे'
Mary Millben | Photo Credits: Twitter

लोकप्रिय अमेरिकन गायिका, अभिनेत्री मॅरी मिल्बेन (Mary Millben) हीने यंदा भारतीयांसाठी, अमेरिकेतीन भारतीय नागरिकांसाठी खास व्हर्च्युअल परफॉर्मंस शेअर केला आहे. दिवाळी 2020 च्या निमित्ताने मॅरीने 'ओम जय जगदीश हरे' हे हिंदी गीत आपल्या आवाजात सादर केलं आहे. काल 11 नोव्हेंबरला युट्युबवर तिने त्याचा खास व्हिडीओ शेअर करत सार्‍यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'भरात. भारतीय लोकं तसेच भारतीय-अमेकिकन समुदाय माझ्यासाठी खास आहे. अशाप्रकारे दिवाळी साजरी करणं माझ्यासाठी वरदानापेक्षा कमी नसल्याच्या भवाना तिने व्यक्त केल्या आहे.

मॅरीच्या आवाजातील 'ओन जय जगदीश हरे' या गाण्याचं संगीत कॅनडाचे स्क्रीन अवॉर्ड, ग्रॅमी अवार्ड्सने गौरवलेले ड्वरिल बेनेट यांचे आहे. ‘सोनी पिक्चर्स' चे निर्माता टिम डेविस, पुरस्कार विजेता इंजीनियर, मिक्सर जॉर्ज विवो, कार्यकारी दिग्दर्शक जॉन स्काउसे आणि अ‍ॅरिझोना मधील प्रोडक्शन कंपनी ‘एंबिएंट स्काईज़' च्या ब्रेंट मैसी व ‘ब्राइडलबीडेना' चे मालक डेना माली सोबत एकत्र येऊन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मॅरीच्या आवाजातील ओम जय जगदीश हरे

दरम्यान या गाण्याच्या शूटसाठी मॅरीने खास भारतीय पारंपारिक वेषभूषादेखील केली होती. नारंगी, गुलाबी घागरा चोळी मध्ये भारतीय अंदाजामध्ये दिमाखदार दिसत होती.

मॅरी यंदा भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्ट 2020 ला भारताचं राष्ट्रगीत देखील गायली होती. या गाण्याच्या माध्यमातूनही तिने भारत प्रेम व्यक्त केलं होतं.