Man Torturing Peacock: मोरावर अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; आरोपी फरार, मध्यप्रेदश राज्यातील घटना
Peacocks | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

एका व्यक्तीने मोरावर अत्याचार (Man Torturing Peacock) केला आहे. या घटनेचा धक्कादाय आणि तितकाच भीषण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यामुळे प्राणीप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांसह निसर्गप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. कथीत व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोराची पिसे काढताना दिसत आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील कटनी (Katni) जिल्ह्यात रविवारी (21 मे) घडली. आरोपी फरार असून पोलीस त्याच्या मागावर असल्याचे वृत्तसंस्था एएनआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच प्राणीपक्षी प्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

आरोपीचे नाव अतूल असे असल्याचे समजते. अतुल असे आरोपीचे नाव आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी मोराची पिसे क्रूरपणे काढत आहे. इतकेच नव्हे तर त्याने हा व्हिडिओ संपादित करुन कृत्य करताना व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर गाणेही जोडले आहे. हा व्हिडिओ गाण्याच्या पार्श्वभूमीस सोशल मीडियावर अपलोड करण्यतात आला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, आरोपी अतुल हा मित्रांसमोर मोराची पिसे बाहेर काढताना दिसत आहे. त्यांनी पार्श्वभूमीत वाजत असलेल्या गाण्यासह व्हिडिओ पोस्ट केला आहे. (हेही वाचा, Man Kiss King Cobra: माणसाने घेतले किंग कोब्राचे चुंबन (Watch Video))

स्थानिक विभागीय वन अधिकारी (डीएफओ) गौरव शर्मा यांनी सांगितले की, दुचाकीच्या क्रमांकावरुन आरोपीची ओळख पटविण्यात आली आहे. आरोपी कटनी जिल्ह्यातील रेठी पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या बाईकच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. डीएफओ म्हणाले, पोलीस पथक आरोपीला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तो घरी नव्हता. मात्र आम्ही लवकरच त्याला अटक करु, असे सांगतानाच त्यांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचेही म्हटले.

मोर हा एक मोठा आणि रंगीबेरंगी पक्षी आहे. जो त्याच्या भव्य आणि रंगीत पिसारा आणि प्रभावी प्रदर्शनासाठी ओळखला जातो. "मोर" हा शब्द विशेषत: प्रजातीच्या नराला सूचित करतो, तर त्याच्या मादीला मराठीत "लांडोर " (peahen) असे म्हणतात. एकत्रितपणे, त्यांना मोर म्हणून ओळखले जाते.

नर मोर त्याच्या सुंदर आणि भव्य अशा रंगीबेरंगी पिसांसाटी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये निळा, हिरवा आणि सोनेरी सारख्या रंगांसह लांब, इंद्रधनुषी पंख असतात. ही पसे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध धार्मिक समारंभ, विवाहसोहळ्याच्या विधी दरम्यान प्रदर्शित केले जातात. पिसांची लांबी पाच फूटांपर्यंत पोहोचू शकते आणि तिचे प्रदर्शन त्याच्या शेपटीच्या पिसांच्या थरथरणाऱ्या आणि खडखडाटासह असते. मोर हे सर्वभक्षी पक्षी आहेत, जे विविध प्रकारचे वनस्पती पदार्थ, कीटक, लहान सरपटणारे प्राणी आणि अगदी लहान सस्तन प्राणी खातात. मोरांचे ओरडणे कधी मंजूळ कधी कर्कश असते. जे दूरपर्यंत ऐकू येते.