Man Kiss King Cobra: माणसाने घेतले किंग कोब्राचे चुंबन (Watch Video)
Man Kiss King Cobra | (Photo Credits: Instagram)

साप (Snake) म्हटलं की आपल्यापैकी अनेकांच्या अंगाचा थरकाप होतो. थोडक्यात सांगायचे तर हे लोक सापाला घाबरतात. पण काही मंडळी मात्र चमत्कारीक असतात. त्यांच्या या चमत्कारीकपणाला धाडस म्हणावे की, वेडेपणा हेच कळत नाही. सोशल मीडियावर असाच एका व्यक्तीचा व्हिडओ व्हायरल झाला आहे. जो चक्क एका सापाचे चुंबन (Man Kiss King Cobra) घेतो आहे. तेही साध्यासुध्या सापाचे नव्हे तर चक्क किंग कोब्रा (King Cobra) या विषारी सापाचे. वाचून विश्वास नाही बसला ना? मग व्हिडिओ पाहा. अर्थात लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. पण व्हिडिओ (Snake Videos) पाहून सोशल मीडियावर अनेक लोक तो शेअर करत आहेत. त्यावर प्रतिक्रियाही देत आहेत. व्हिडिओतील व्यक्ती सापाचे चुंबन घेत असेल तरी हेही तितकेच खरे की, काही लोक त्यांची पूजा करतात.

निक द रँग्लरने नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. निक द रँग्लरने त्याच्या बायोमध्ये, तो स्वत:ची ओळख प्राणी आणि सरपटणाऱ्या पाण्याचा मित्र अशी करुन देतो. व्हिडिओमध्ये निक सावधपणे 12 फूट लांब किंग कोब्राला पकडताना दिसत आहे. त्यानंतर त्याने सरपटणाऱ्या प्राण्याच्या डोक्यावर चुंबन घेतले आणि त्याच्यासोबत काही सेकंद पोझ दिली. हा सरपटणारा प्राणी म्हणजेच किंग कोब्रा. (हेही वाचा, Snake Viral Video: 15-फूट-लांब किंग कोब्राला सर्प मित्राने केलं रेस्क्यू; व्हिडिओ पाहून फुटेल तुम्हाला घाम, Watch)

ट्विट

आतापर्यंत या व्हिडीओला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर लोकांनी या व्हिडिओबद्दल बरेच काही लिहिले आहे. काहींना व्हिडिओ आवडा. तर काहींना निकपद्दल भलतीच काळजी व्यक्त केली आहे. व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने म्हटले आहे की, मी तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत नाही, परंतु मला तुमची काळजी आहे. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीची मी कौतुककरतो. दुसऱ्या एका युजर्सने म्हटले आहे की, काळजी घे. आणखी एक युजर्स म्हणतो मला साप आवडत नाहीत." जेव्हा मी त्यांना पाहतो तेव्हा मी घाबरून जातो, परंतु मला असेही वाटते की जीवन म्हणजे तुमच्या भीतीवर मात करणे आणि त्यावर मात करणे. मी यातून प्रेरणा घेईन.