Man Cuts His Penis: पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी व्यक्तीने आपले पेनिस कापुन फेकले; वाचा नक्की काय घडले
प्रतीकात्मक फोटो (Picture Courtesy: Pexels)

टेनेसीचा एक माणूस (Tennessee Man) पोलिसांपासून वाचण्यासाठी पळत होता आणि या दरम्यान त्याने असे काही कृत्य केले आहे जे ऐकूण कोणालाही धक्का बसेल . असे सांगितले जात आहे की, टेनेसीच्या कुकविले (Cookeville) येथे राहणाऱ्या 39 वर्षीय टायसन गिल्बर्टने जेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग केला तेव्हा त्याने आपले लिंग कारमधून फेकले. आणि ती व्यक्ती म्हणते की, त्याने हे जग वाचवण्यासाठी केले आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा पोलिस त्याला डॉवेलटाउन शहराजवळ हायवे 70 वर रहदारीत अर्धवट उभे असल्याचे दिसले तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. रेडियो स्टेशन WLJE शी बातचीत करताना टेनेसी हाइवे पेट्रोल  (Tennessee Highway Patrol) ट्रूपर बॉबी जॉन्सन ने सांगितले की, अधिकाऱ्यांनी सुरुवातीला त्याला लाईट लावून संकेत देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो पळून गेला. (Aggressive Sex Act: सेक्स करताना मुलाने केले असे काही की तरुणीचा फाटला कान, आता लोकांकडून मागतेय सल्ला )

डॉव्हलटाऊन ते लेबनॉन पर्यंतच्या दोन काउंटीमध्ये अधिकाऱ्यांनी शेवटी गिलबर्टचा पाठलाग करणे सोडून दिले. वाटेत कुठेतरी त्या माणसाने त्याचे लिंग कापून फेकले. पाठलाग करताना एकादा तो बाजूच्या रस्त्याकडे वळला आणि त्याच्या कारचा दरवाजा उघडला, ज्यामुळे अधिकाऱ्यांना त्याच्या विचित्र आणि उन्मादी स्थितीची झलक मिळाली. जॉन्सन म्हणाला की, तो रस्त्यावर होता आणि ओल्ड लिबर्टी रोडवर थांबला. जेव्हा त्याने आपला दरवाजा उघडला तेव्हा तो विवस्त्र आणि रक्ताने माखलेला दिसला, त्यानंतर त्याने आपल्या कारचा दरवाजा बंद केला आणि गाडी चालवत राहिला.

रक्ताने माखलेला गिल्बर्ट पश्चिमेकडे विल्सन काउंटीमध्ये पुढे जात असल्याचे सांगितले गेले. अखेरीस, बऱ्याच प्रयत्नांनंतर गिल्बर्टला पकडण्यात आले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. यासह त्याच्या जखमेवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली.व्ह्यूजवीकच्या विनंतीला प्रतिसाद देत, THP सार्वजनिक माहिती कार्यालयाने बुधवारी सकाळी गिलबर्टच्या शोध आणि स्थितीशी संबंधित अनेक तपशीलांची पुष्टी केली, ज्यात तो आत्म प्रवृत्त जखमेने ग्रस्त होता. माहितीच्या प्राथमिक स्वरूपामुळे आणि सुरू असलेल्या तपासामुळे, गिलबर्टच्या कथित इजाच्या अधिक विचित्र पैलूंची अधिकारी त्वरित पुष्टी करू शकले नाहीत. (Kolkata: मास्क घातले नाही म्हणून फटकारले, पुरुषाने ऑटोरिक्षामध्ये केला महिलेचा विनयभंग )

अधिकाऱ्यांच्या मते, गिलबर्टने सांगितले की  त्याने स्वतः त्याचे लिंग कापले, कारण त्याला रेडिओ व्हॉईस द्वारे तसे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, रेडिओवरील आवाजांनी त्याला समजावून सांगितले की जगाला वाचवण्यासाठी माणसाला आपले लिंग कापण्याची गरज आहे. त्या व्यक्तीला उपचारासाठी जवळच्या व्हँडरबिल्ट रुग्णालयात नेण्यात आले. बुधवारपासून त्याची स्थितीबाबत अपडेट देण्यात आलेले नाहीत.