Kolkata: मास्क घातले नाही म्हणून फटकारले, पुरुषाने ऑटोरिक्षामध्ये केला महिलेचा विनयभंग
Representational Image (Photo Credits: Twitter)

Kolkata: चालत्या ऑटोमध्ये एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गिरीश पार्क पोलीस स्टेशन अंतर्गत विवेकानंद रोड आणि चित्तरंजन अव्हेन्यू क्र‌ॉस‌िंग येथील आहे. पिंटू प्रामाणिक (21) असे आरोपीचे नाव आहे. तो श्यामपुकुर येथील हिरालाल मित्र रोडचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोराबागन ट्रॅफिक गार्डचे सार्जंट कौशिक चक्रवर्ती यांच्या तत्परतेने आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्मायपुकुर येथील एका महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी जेव्हा ती ऑफिसला निघाली तेव्हा तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिचा पाठलाग सुरू केला. महिलेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती पहिल्यांदा बसमध्ये चढली, तेव्हा आरोपी ही त्या बसमध्ये चढला. (World's Fastest Rollercoaster: अनेकांच्या शरीरातील हाडे तुटल्यानंतर आता सर्वाधिक वेगवान असलेला रोलरकोस्टर बंद )

पाठलाग केल्याने वैतागलेली महिला गिरीश पार्क क्रॉसिंगवर बसमधून उतरली आणि मग माणिकटल्लाच्या दिशेने जाण्यासाठी ऑटोमध्ये चढली. याच दरम्यान आरोपी आला आणि त्याच ऑटोमध्ये बसला आणि जबरदस्तीने तिच्या मांडीवर बसला.महिलेचा आरोप आहे की, आरोपीने तिच्या मांडीवर बसून तिचा विनयभंग केला. आरोपीचे असभ्य कृत्य वाढत असल्याचे पाहून महिलेने गिरीश पार्क क्रॉसिंगवर ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक सार्जंट कौशिक चक्रवर्तीकडे मदत मागितली.

महिलेला ओरडताना पाहून आरोपी ऑटोमधून खाली उतरला आणि पळून जाण्याचा मार्ग शोधू लागला तेव्हाच ट्रॅफिक सार्जंट कौशिक चक्रवर्ती यांनी आरोपी तरुणाला पकडले आणि गिरीश पार्क पोलीस ठाण्यात माहिती दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली आहे.