सिनेमातील एखादा सीन डोळ्यासमोर यावा तशीच काहीशी घटना नायजेरीयात लागोसमध्ये मुरताला इंटरनॅशनल एअरपोर्टवर घडली. हा अजब प्रकार पाहून तुम्हीही थक्क व्हाल. विमान टेकऑफच्या तयारीत असताना एक माणून थेट विमानाच्या पंख्यावर चढला आणि तेथून विमानाच्या केबिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करु लागला. 19 जुलै रोजी झालेला नाट्यमय प्रसंग विमानातील एका प्रवाशाने कॅमेऱ्यात कैद केला आहे. तसंच हा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवरही शेअर केला.
हा व्हिडिओ शेअर करत त्या प्रवाशाने लिहिले की, "मागील 30 मिनिटांपासून आम्ही एमएमआयएच्या धावपट्टीवर अडकून पडलो आहोत. एक जण बॅग घेऊन विमानाच्या पंखावर चढला आहे. इमर्जन्सी आहे."
तसंच पुढे त्याने लिहिले की, सुरक्षा रक्षक अजून दिसले नसून भितीचे वातावरण आहे. मला भरपूर प्रश्न विचारायचे आहेत पण आता मी श्वासही घेऊ शकत नाहीय. हे योग्य यंत्रणांपर्यंत पोहोचवा.
पहा व्हिडिओ:
पुढे त्याने घटनेचे अपडेट्स देताना लिहिले की, अखेर त्या व्यक्तीला अटक झाली. आम्हाला सर्वांना विमानातून खाली उतरवण्यात आले. उस्मान आदामू असे या स्टंट करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याने हा सर्व प्रकार का केला, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.