Kerala Bus Masturbation Video: केरळमधील एर्नाकुलममध्ये एका पंधरवड्याच्या आत बसमध्ये महिलेवर अश्लील कृत्याची (Obscene Act) दुसरी घटना समोर आली आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी एका व्यक्तीला बसमध्ये अश्लील कृत्य करताना पकडले होते. आता अशीच आणखी एक घटना पय्यानूरजवळ समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीने महिलेसमोर हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ महिलेने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे.
पय्यानूरजवळील चेरुपुझा येथे रविवारी केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एक महिला चढली. बसमध्ये निळा टी-शर्ट आणि पांढरे धोतर घातलेला आणि काळा मास्क घातलेला एक व्यक्ती वर्तमानपत्र वाचत होता. बसमध्ये या व्यक्तीशिवाय दुसरे कोणी नव्हते. महिला बसमध्ये चढल्यानंतर त्या व्यक्तीने अश्लील कृत्य सुरू केल्याचे सोशल मीडियावरील सार्वजनिक व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर ती व्यक्ती बसमधून उतरताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. बसमधील महिलेने हा व्हिडिओ आपल्या फोनवरून बनवला असल्याचे समजते. (हेही वाचा - Woman Stripped Naked in Temple: बालीमध्ये परदेशी महिलेने नग्न होऊन केला हिंदू मंदिरात प्रवेश; व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी घेतले ताब्यात)
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी हा व्हिडिओ पाहिला असून ही घटना 28 मे रोजी घडली. तक्रार घेण्यासाठी पोलीस महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत आम्हाला या घटनेबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही आणि त्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे. दोन आठवड्यांपूर्वी एर्नाकुलम जिल्ह्यात एका तरुणाला महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.