इंडोनेशियातील बाली येथे एका जर्मन महिला पर्यटकाला मंदिरात नग्नावस्थेत प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या हिंदू मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी महिलेने आपले सर्व कपडे उतरवल्याचे सांगण्यात येत आहे. दार्जा तुचिन्स्की, वय 28 असे या आरोपी महिलेचे नाव आहे. Mirror.CO.UK मधील वृत्तानुसार, बालीमधील एका हिंदू शोचे तिकीट नाकारण्यात आल्यानंतर दार्जा तुस्चिन्स्कीने हे विचित्र पाऊल उचलले. मंदिरात प्रवेश करताना तुस्चिन्स्कीने सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली आणि निषेध म्हणून स्वत: ला नग्न केले. आपले कपडे काढल्यानंतर तिने मंदिराचे मोठे गेट उघडण्यासाठी धाव घेतली. दरवाजा उघडून ती आत गेली व गुडघे टेकून प्रार्थना करण्याच्या स्थितीत बसली.

त्यानंतर मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि तिला ताब्यात घेतले. नंतर तिला उबुद जिल्ह्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जर ती या प्रकरणी दोषी ठरली तर, तिला किमान दोन वर्षे आठ महिने तुरुंगवास भोगावा लागेल. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: चालत्या गाडीवर पती करत धूम्रपान पत्नी करत होती मदत, व्हिडीओ व्हायरल)

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)