महेंद्र सिंह धोनी ची लेक झिवा झाली 'रॉकस्टार'; गिटार वाजवत गाणं गातानाच व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
Ziva (Photo Credits: Instagram)

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) त्याच्या क्रिकेटमधील योगदानामुळे जितका चर्चेत आहे, तितकीच चर्चेत त्याची लाडकी लेक 'झिवा' (Ziva) सुद्धा असते. माही (Maahi) आणि साक्षी हे दोघे पती-पत्नी आपल्या गोड मुली झिवाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असतात. त्यात आता महेंद्रसिंह धोनी ने झिवाचा एक नवीन व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात व्हिडिओमध्ये झिवा चक्क गिटार वाजवत सुंदर इंग्रजी गाणे गाताना दिसत आहे. ती हे गाणे किती मनापासून गात आहे हे या व्हिडिओमधून दिसत आहे. धोनी सध्या मैदानापासून दूर असून आपल्या कुटुंबासोबत मसूरी येथे सुट्टीसाठी गेला आहे. या ठिकाणचाच त्याचा मुलगी झिवासोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये झिवा एखाद्या रॉकस्टारप्रमाणे गात आहे. ‘लँड ऑफ हारमनी’ हे इंग्लिश गाणं म्हणत आहे. पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

Snow brings the best out of her @ziva_singh_dhoni

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

हेदेखील वाचा- एमएस धोनीची लेक झिवा हिने हातात घेतली तलवार; झांसीची राणी बनत 'या' स्पेशल गाण्यावर केलं सादरीकरण, पहा व्हिडिओ

धोनीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये झिवा अगदी लहानग्या वयातही गाणं म्हणताना गिटारही वाजवत आहे. यात ती अगदी गाण्याच्या तालानुसार गिटारवर हात फिरवत आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत या व्हिडीओला 22 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

काही दिवसांपूर्वी या जोडप्याने झिवा चा असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धोनी आणि झिवा दोघेही बर्फाचा आनंद घेताना दिसत आहे. झिवासोबत एक कुत्राही दिसत आहे. झिवाने धोनीसोबत मिळून तेथील बर्फापासून एक स्नो मॅन बनवल्याचं दिसत आहे. या स्नो मॅनकडे कुतूहलाने पाहत झिवा शेजारी उभ्या असणाऱ्या कुत्र्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवताना दिसत आहे.