Lockdown Memes and Jokes 2021: सोशल मीडियावर लॉकडाऊन मीम्स आणि जोक्सचा वर्षाव; युजर्संनी दिल्या हास्यास्पद प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेले मीम्स (Photo Credits: Twitter)

Lockdown Memes and Jokes 2021: महाराष्ट्रात कोविडची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मुंबईतही कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबईत कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यात मॉल आणि शॉपिंग सेंटरमध्ये जाणाऱ्या नागरिकांची अँटीजन चाचणी (Antigen Tests) किंवा आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी नकारात्मक असणे आवश्यक असणार आहे. म्हणजेचं नागरिकांना कोरोना निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय मॉल्समध्ये जाता येणार नाही. येत्या 22 मार्चपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. तसेच यापूर्वी बीएमसीने असे घोषित केले गेले होते की, परिसरात पाच किंवा त्याहून अधिक कोरोनाग्रस्त आढळल्यास इमारत सील केली जाईल.

या सर्व नियमांनंतर महाराष्ट्रात लॉकडाउन लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यानंतर ट्विटरवर #Lockdown ट्रेंड होत आहे. लोक सोशल मिडीयावर ट्वीट व मीम्सद्वारे आपली व्यथा व्यक्त करीत आहेत. (वाचा - Fact Check: सर्व राज्यातील शाळा-कॉलेजेस बंद, परीक्षा रद्द? PIB ने सांगितले व्हायरल मेसेज मागील सत्य)

ट्विटरवर ट्रेंड होणारे मीम्स - 

गजब - 

डोळ्यात अश्रू आले -

यावेळी किती दिवसांचा कार्यक्रम आहे?

#lockdown ट्रेंडिंग - 

मला तर आनंद वाटत आहे

विद्यार्थी भावनिक झाले -

विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया -

विद्यार्थी आणि इतर -

काहीच बदललं नाही -

नशीबचं वाईट आहे - 

सहन करू -

कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत या वर्षातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 40, 953 नवीन घटना समोर आल्या आहेत. यासह देशात संक्रमित होणाऱ्यांची एकूण संख्या 1 कोटी, 15 लाख, 55 हजार, 284 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात, कोरोनामुळे 188 रुग्णांनी आपला जीव गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.