Lion Hug Man | (Photo Credit - Twitter)

Heartwarming Embrace Video: वन्य प्राण्यांबाबत मनुष्य प्राण्यांच्या अनेक संकल्पना असतात. कधी त्या वास्तवतेला धरुन असतात कधी त्या अगदीच कल्पनेच्या जगातील आणि मनोरंजकही असतात. जसे की, वाघ, सिंह यांना प्रतीकात्मक रूपात मानने. सिंहाला जंगलचा राजा म्हणने वगैरे वगैरे. पण, कधी कधी अशा काही अचाट गोष्टी घडतात की त्याची दखल घ्यावीच लागते. आजकाल इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळात अशी दखल काहीशी अधिच प्रमाणात घेतली जाते. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे नेटीझन्सनी व्हायरल केलेला एक दखलपात्र व्हिडिओ. ज्यामध्ये पाहायला मिळते की चक्क सिंहाने माणसाला मिठी (Lion Hug Man Viral Video) मारली आहे.

खरे तर सिंह म्हणजे हिंस्त्र श्वापद. सहाजिकच ते इतर वन्य प्राण्यांबरोबच संधी मिळताच मानवालाही खाणार. पण इन्स्टाग्रामवरील @african_animal या हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भलतेच पाहायला मिळते. या व्हिडिओत दिसते की, चक्क एक सिंह एका माणसाला पाहून अतिशय आनंदी होतो. तो त्याच्याकडे झेपावतो आणि चक्क त्याला मिठी मारतो. सिंहाचे वजन या व्यक्तीला झेपावले नसल्याने दोघेही जमीनीवर आदळतात. पण त्यांच्यातील हृदयस्पर्शी प्रेम पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल 85,000 लाइक्स मिळाले आहेत आणि त्यांची संख्या अद्यापही वाढत आहे.

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by African animals (@african_animal)

सिंह हा एक मोठा मांसाहारी सस्तन प्राणी आहे. जो पँथेरा वंशातून येतो. त्याला वैज्ञानिकदृष्ट्या पँथेरा लिओ म्हणून ओळखले जाते. मानवी दृष्टीकोणातून पाहिल्यास सिंह हा प्रतिष्ठित प्राणी आहे. त्यांचे भव्य स्वरूप, सामर्थ्य आणि त्यांच्या परिसंस्थेतील प्रमुख भूमिकेमुळे त्यांना "जंगलाचा राजा" म्हणून संबोधले जाते. सिंह केवळ पर्यावरणाच्या समतोलासाठीच महत्त्वाचे नसून मानवी इतिहास, पौराणिक कथा आणि संस्कृतीतही त्यांचे विशेष स्थान आहे. मानवी जीवनाच्या अनेक पैलुंसाठी सिंहाचे गुण सामर्थशाली आणि प्रेरणादायी ठरतात. म्हणूनच अनेकदा त्याला विविध संस्था, संघटना प्रतिकात्मक रुपात मानतात, वापरतात.